BSNL मोफत देतेय 5GB डेटा, हे ग्राहक घेऊ शकतात फायदा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020
  • सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक नविन प्रमोशनल ऑफर सुरू केली आहे. 
  • या ऑफरनुसार कंपनी आपल्या निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सवर २२ दिवसांच्या वैधतेसह मोफत 5GB हाय-स्पीड डेटा देत आहे.  

मुंबई :- सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक नविन प्रमोशनल ऑफर सुरू केली आहे.  या ऑफरनुसार कंपनी आपल्या निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सवर २२ दिवसांच्या वैधतेसह मोफत 5GB हाय-स्पीड डेटा देत आहे.  कंपनीच्या मल्टी-रिचार्ज सुविधेद्वारे रिचार्ज करणाऱ्यांना कंपनीच्या या ऑफरचा लाभ मिळेल.

बीएसएनएलच्या ९८ रुपये, ९९ रुपये, ११८ रुपये, १८७ रुपये आणि ३१९ रुपयांच्या एसटीव्ही अर्थात स्पेशल टॅरिफ व्हाउचर्सवर ही ऑफर आहे. याशिवाय १८६ रुपये,  ४२९ रुपये,  ४८५ रुपये,  ६६६ रुपये आणि १,९९९ रुपयांच्या व्हाउचर्सवरही ग्राहकांना मोफत 5GB  हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. पण अतिरिक्त डेटाची ही ऑफर जे ग्राहक आपल्या सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह व्हाउचरची वैधता संपण्याआधी दुसरे किंवा तिसरे रिचार्ज करतील त्यांच्यासाठीच आहे.

ही प्रमोशनल ऑफर १९  नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. बीएसएनएलच्या चेन्नई डिव्हिजनने या ऑफरबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली असून देशभरातील सर्व सर्कलसाठी ही ऑफर लागू असेल. बीएसएनएलने जुलै महिन्यापासूनच आपल्या ग्राहकांसाठी मल्टी-रीचार्ज सुविधेची सुरूवात केली आहे. यानुसार ग्राहक आपला अ‍ॅक्टिव्ह प्लॅन संपण्याआधीच अ‍ॅडव्हान्समध्ये अकाउंट रिचार्ज करु शकतात. या प्लॅनशिवाय बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी काही दिवसांपूर्वीत ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटासह (डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 80Kpbs) कॉलिंगसाठी २५० मिनिटे मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी ८० दिवस आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News