बीएससी ऍग्री आहात? तर मग या सरकारी कंपनीमध्ये तुम्हाला मिळू शकते नोकरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 3 September 2020

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने मॅनेजमेंट ट्रेनी, सीनियर ट्रेनी, डिप्लोमा ट्रेनी अशा विविध पदांच्या २१० जागांसाठी जाहिरात दिली आहे.

मुंबई : तुम्ही बीएससी अग्री पदवीधारक असाल तर आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने मॅनेजमेंट ट्रेनी, सीनियर ट्रेनी, डिप्लोमा ट्रेनी अशा विविध पदांच्या २१० जागांसाठी जाहिरात दिली आहे. आणि हो, तुमच्यापैकी कोणी बीएससी ऍग्री पदवीधारक नसलात तरीही हरकत नाही. अन्य पदवीधारकही काही पदांसाठी असलेल्या निकषांमध्ये पात्र ठरले तर त्यांनाही नोकरी मिळू शकते.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ सप्टेंबर २०२०

पदाचा तपशिल, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

पदाचे नाव आणि तपशील :

अनु. क्र      पदांचे नाव    पदे

१.     मॅनेजमेंट ट्रेनी        २६   

२.     सीनियर ट्रेनी        ५९

३.     डिप्लोमा ट्रेनी        ०७

४.     ट्रेनी               ११२

५.     ट्रेनी मेट            ०३

६.     लीगल ऍसिस्टंट   ०३

 

पद, शैक्षणिक पात्रता आणि वेतन

मॅनेजमेंट ट्रेनीः (२६)

 • एमबीए (एग्रीकल्चर बिजनेस मॅनेजमेंट) किंवा बीएससी (अग्रीकल्चर), सिव्हील किंवा एग्रीकल्चर किंवा इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग
 •   ३ वर्षाचा अनुभव
 •  वेतन- ४३ हजार ५२० रुपये

सीनियर ट्रेनीः ५९

 • एमबीए (एग्रीकल्चर बिजनेस मॅनेजमेंट) किंवा बीएससी (एग्रीकल्चर), सिव्हील किंवा एग्रीकल्चर किंवा इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग
 • ३ वर्षाचा अनुभव
 • वेतन - २३ हजार ९३६ रुपये

डिप्लोमा ट्रेनीः ०७

 • एमबीए (एग्रीकल्चर बिजनेस मैनेजमेंट) किंवा बीएससी (एग्रीकल्चर), सिव्हील किंवा एग्रीकल्चर किंवा इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग
 • ३ वर्षाचा अनुभव
 • वेतन - २३ हजार ९३६ रुपये

ट्रेनीः ११२

 • बीबीए किंवा बीसीए किंवा बीए (पर्सनल मैनेजमेंट) किंवा बीकॉम किंवा केमिस्ट्री, बॉटनीमध्ये बीएसस्सी किंवा फिटर आयटीआय प्रमाणपत्र
 •  वेतन - १८ हजार ४९६ 

ट्रेनी मेटः ३

 • बारावी पास, एग्रीकल्चर पदवीका कोर्स उत्तीर्ण
 •    वेतन - १७ हजार ९५२

लीगल असिस्टेंटः ०३

 • कायद्याची पदवी
 • ३ किंवा ५ वर्षे पूर्ण 
 • वेतन - २२ हजार रुपये

 

शुल्क : सर्वसामान्य उमेदवार, ओबीसी, निवृत्त कर्मचारी यांना ५२५ रुपये, अनुसुचित जाती- जमाती, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५ रुपये प्रोसेसिंग फी आकारण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 
लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले. उद्योग, व्यवसायात काम करणारे लाखो कामगार बेरोजगार झाले. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी दर वाढत आहे. अशा परिस्थितीत नॅशनल सीड्स ऑफ कॉर्पोरेशन लिमिटेडने रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. तुम्ही त्याचा लाभ नक्कीच घेऊ शकता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News