दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा - रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 23 August 2020

दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा - रोहित पवार

दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा - रोहित पवार

दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्थानमधील कराची शहरात असल्याचं काल पाकिस्तानमधील मीडियानं जाहीरं केलं. त्यामुळे तो कराचीत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

काल दाऊद कराचीत असल्याचं पाकिस्ताननं कबूल केलं. त्यामुळे त्याला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी आमदार विनंती रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींकडे केली आहे.

काल दाऊद पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्यावतीने जगातील ८८ दहशतवादी नेत्यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत दाऊद आणि त्याच्या साथीदारांचा समावेश आहे.

पाकिस्तानात असलेली दाऊदची मालमत्ता सरकारने ताब्यात घेण्याचे ठरविले आहे. अशी माहिती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परीषदेच्या अहवालात देण्यात आली आहे. १९९३ मध्ये मुंबई शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. त्यावेळी हल्ल्यात साधारण ३५० लोकांचा प्राण गेला होता. १२०० हून अधिक लोक जखमी झाले होते. भारताने अमेरिकेसोबत मिळून २००३ मध्ये दाऊदचं नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं होतं.

दाऊदला संयुक्त राष्ट्र इंटरपोलने अशिया खंडातील सर्वात मोठा अमली पदार्थ तस्कर म्हणून घोषित केलं आहे. त्याचबरोबर त्याचे दहशतवाद्यांशी सुध्दा संबंध असल्याचे म्हटले आहे. आयबीच्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम आणि त्याचा छोटा भाऊ शेख अनीस इब्राहिम सिंथेटिक ड्रग्ससोबतच हेरोईन आणि अफीमचाही व्यवसाय करतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News