श्‍वासोच्छ्‌वासापासून होतेय स्वच्छ अंतःकरणाची सुरुवात  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

शरीराकडून अंतःकरणाकडे जायला पूल आहे, त्याला श्‍वासोच्छ्‌वास म्हणतात. तो शरीरात उत्पन्न होतो आणि मनोविकाराप्रमाणे बदलतो. आपला श्‍वास स्थिर असल्यास पोटाने सहज चालतो.

शरीराकडून अंतःकरणाकडे जायला पूल आहे, त्याला श्‍वासोच्छ्‌वास म्हणतात. तो शरीरात उत्पन्न होतो आणि मनोविकाराप्रमाणे बदलतो. आपला श्‍वास स्थिर असल्यास पोटाने सहज चालतो. तो अस्थिर असेल तितका छातीकडे जाऊ लागतो. पूर्ण बिघडला असल्यास फक्त छातीच हलते. सदैव श्‍वासाकडे लक्ष ठेवणे याहून नियोजन करण्यासारखे आयुष्यात काहीही नाही.

आपला श्‍वास हा कधीही बिघडू देऊ नये. श्‍वास ही शरीरातील पहिली गोष्ट आहे की, ज्याच्या आधारावर शरीरातील साऱ्या क्रिया चालू आहेत. हा श्‍वास आपण कधीही घेत नाही. तो येतो. श्‍वास न घेण्याचा प्रयत्न करून पाहा, तो आत येणारच. आपण फक्त त्याची दिशा ठरवू शकतो. तर ती दिशा ही पोटाकडे ठेवावी. पोट हलत राहिले पाहिजे. हे जमले म्हणजे श्‍वासदेखील आपण घेत नाही, हे समजते. त्यामुळे अवास्तव अहंकार टिकत नाही. अंतःकरण साफ करण्याची ही पहिली पायरी. अंतःकरणाचे काय सांगावे? त्याबद्दल सांगताना भलेभले थकले. पण, तरीसुद्धा सांगायचे म्हणजे अंतःकरणाचे चार भाग कल्पिलेले आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे ते चार भाग. मन प्रत्येक गोष्टीचा साधकबाधक विचार करते.

बुद्धी त्यावर निर्णय घेते. चित्त हे लक्ष ठेवते आणि मी पणाची जाणीव म्हणजे अहंकार. प्रत्येक क्षणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि जरूरीपुरता अहंकार एकत्रितपणे ठेवणे म्हणजे योग. यापैकी चालू क्षणापासून यातील कोणताही भाग दूर गेला की वियोग होतो आणि तो दुःखद असतो. मन थाऱ्यावर नाही, बुद्धी भ्रष्ट झाली आहे, चित्त विचलित झाले आहे असे आपण म्हणतोच. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News