सहकार्याचे ब्रीद

मंगेश वसंत सावंत
Tuesday, 1 October 2019

काळ कसा येईल नाही कुणास ठावे
आज ते अडकले उदया आपलीही सुटका नाही
दोष देत नाही बसायचे नशिबाला
निसर्गाचा कहर ही काही सृष्टीची चूक नाही

नकोय ते बटबटीत जगणे
स्व: आनंदात उत्साही वागणे
माणसं आहोत माणसांसाठी
हवे आज मितीला माणूसकी जपणे

उघडा डोळे खोला मुठी
फक्त तुमच्या एका मदतीसाठी
नाही जाता आले जवळ जरी
धजा सहकार्याने कर्तव्य बजावण्यासाठी

काळ कसा येईल नाही कुणास ठावे
आज ते अडकले उदया आपलीही सुटका नाही
दोष देत नाही बसायचे नशिबाला
निसर्गाचा कहर ही काही सृष्टीची चूक नाही

चला एक दिलाने एक मनाने
थेंबे थेंबे तळे साचून मदतीचा ओघ वाढे
हात हाती देऊन मानवतेची साखळी करू
परमार्थ याची जाणून आयुष्यात सत्कार्य घडे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News