श्वास नवा

अविनाश स्मार्त
Tuesday, 7 May 2019
वादळानंतरच्या विध्वंसाची लक्तरं
एकमेकांना जोडून
गोधडी शिवायचीय मला
श्वास घ्यायचाय मला...

श्वास घ्यायचाय मला...
गहिऱ्या तळाशी बुडत चाललेल्या आत्म्याला
बकोट धरून किनाऱ्यावर आणायचय
श्वास घ्यायचाय मला... 
 
पराभूत ठरवणाऱ्या प्रत्येक
आडदांड संकटांच्या डोळ्यातून
वहात असलेले संकटांचे
काळेकुट्ट पाट चिरून
त्यातलं मृगजळ शोधायचय मला
श्वास घ्यायचाय मला... 
 
वादळानंतरच्या विध्वंसाची लक्तरं
एकमेकांना जोडून
गोधडी शिवायचीय मला
श्वास घ्यायचाय मला...
 
माझ्या जिवंतपणाचं विस्मरण
बारीकशी धूग असलेल्या
कपारीतला निखाराच दूर करू शकेल
तो निखारा शोधायचाय मला
श्वास घ्यायचाय मला...
श्वास घ्यायचाय मला...
गहिऱ्या तळाशी बुडत चाललेल्या आत्म्याला
बकोट धरून किनाऱ्यावर आणायचय
श्वास घ्यायचाय मला... 
 
पराभूत ठरवणाऱ्या प्रत्येक
आडदांड संकटांच्या डोळ्यातून
वहात असलेले संकटांचे
काळेकुट्ट पाट चिरून
त्यातलं मृगजळ शोधायचय मला
श्वास घ्यायचाय मला... 
 
वादळानंतरच्या विध्वंसाची लक्तरं
एकमेकांना जोडून
गोधडी शिवायचीय मला
श्वास घ्यायचाय मला...
 
माझ्या जिवंतपणाचं विस्मरण
बारीकशी धूग असलेल्या
कपारीतला निखाराच दूर करू शकेल
तो निखारा शोधायचाय मला
श्वास घ्यायचाय मला...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News