आयपीएलच्या सुरुवातीस या दोन देशांचा ब्रेक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020
  • इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आयपीएलच्या पहिल्या आठवड्यास मुकणार, हे आता निश्‍चित झाले आहे.
  • या दोन देशांतील मिळून २८ खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतीत नसणार, हे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली :-  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आयपीएलच्या पहिल्या आठवड्यास मुकणार, हे आता निश्‍चित झाले आहे. या दोन देशांतील मिळून २८ खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतीत नसणार, हे स्पष्ट झाले आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये तीन ट्‌वेंटी २० तसेच तीन एकदिवसीय लढती खेळणार आहे. या दौऱ्याची सांगता १६ सप्टेंबरला होणार आहे. आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया खेळाडूंसाठी विलगीकरणाचे नियम शिथिल करावेत, ही फ्रॅंचाईजची मागणी भारतीय मंडळाने फेटाळली आहे. केवळ याच मालिकेत नव्हे, तर वेस्ट इंडिजमधील लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना या विलगीकरणातून सूट नसेल, हे स्पष्ट करण्यात आले. आयपीएलसाठी ऑस्ट्रेलियाचे १८; तर इंग्लंडचे ११ खेळाडू करारबद्ध आहेत.
इंग्लंड - ऑस्ट्रेलियातील लढती जैवसुरक्षित वातावरणात आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी विलगीकरणाचे नियम शिथिल करण्याची विनंती भारतीय मंडळाने स्वीकारली नाही. आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. त्यांना एखाद-दोन सामन्यास मुकावे लागेल, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी फ्रॅंचाईजना स्पष्ट केले आहे.

आयपीएल खेळण्यासाठी अमिरातीत येणारा प्रत्येक खेळाडू सात दिवस विलगीकरणात राहील. त्याची त्या कालावधीत तीनदा चाचणी होईल. ही चाचणी निगेटिव्ह असल्यासच खेळाडूस सरावाची मंजुरी देण्यात येणार आहे. अर्थात त्यापूर्वी सर्वच खेळाडूंना अमिरातीचे नियम पाळणे बंधनकारक असेल. अमिरातीत दाखल होणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होते. या चाचणीचा अहवाल येईपर्यंत विलगीकरण सक्तीचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास ४८ ते  तास लागतात. त्यानंतर आयपीएलपूर्वीचे विलगीकरण होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News