सर्वोत्तम ५० फुटबॉल क्‍लबची ब्रॅंड व्हॅल्यू ‘या’ कारणामुळे घसरली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • कोरोना महामारीचे चटके मोठ्या प्रमाणावर फुटबॉल जगतास बसल्याचे आता अधोरेखित होण्यास सुरुवात झाली आहे.
  • या महामारीमुळे जगातील अव्वल ५० फुटबॉल क्‍लबची ब्रॅंड व्हॅल्यू तब्बल ७५ कोटी युरोनी कमी झाली आहे.

लंडन :- कोरोना महामारीचे चटके मोठ्या प्रमाणावर फुटबॉल जगतास बसल्याचे आता अधोरेखित होण्यास सुरुवात झाली आहे. या महामारीमुळे जगातील अव्वल ५० फुटबॉल क्‍लबची ब्रॅंड व्हॅल्यू तब्बल ७५ कोटी युरोनी कमी झाली आहे. सहा वर्षांत हे प्रथमच घडले आहे. ला लीगा विजेतेपदाचा दुष्काळ रेयाल माद्रिदने संपवला आहे; पण त्यांची ब्रॅंड व्हॅल्यू १४ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. अर्थात गत चॅम्पियन्स लीगमधील कामगिरीचाही यावर परिणाम झाला आहे. बार्सिलोनाने मॅंचेस्टर युनायटेडला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला.

स्पेनमधील क्‍लबची आर्थिक स्थिती सावरण्यास नव्या दूरचित्रवाणी कराराचा फायदा झाला. त्यानंतरही रेयाल माद्रिद, बार्सिलोनापेक्षा तिसऱ्या क्रमांकावरील ऍटलेटीको माद्रिद तीनशे टक्‍क्‍यांनी मागे आहे. रेयाल माद्रिदच नव्हे, तर कोरोनाचा फटका आघाडीच्या ५० क्‍लबना बसला. तिकिटाचे उत्पन्न, दूरचित्रवाणी हक्क तसेच पुरस्कर्त्यांकडून मिळणाऱ्या रकमेत घट झाली आहे. कोरोनाच्या ब्रेकनंतर झालेल्या ५०१ लीग सामन्यातून तिकीटविक्रीचे काही उत्पन्न मिळाले. आता कदाचित आघाडीच्या क्‍लबसाठी हे मोलाचे नसेल; पण स्कॉटलंडमधील क्‍लबच्या उत्पन्नात तिकीटविक्रीचा वाटा ४१ टक्के असतो, तर प्रीमियर लीग संघाच्या उत्पन्नात तो अवघा १३ टक्के. कोरोनामुळे लढती कमी झाल्यामुळे प्रीमियर लीगमधील संघांना स्थानिक प्रक्षेपकांना ३३ कोटी पौंड द्यावे लागले. फ्रान्समधील लीग वन रद्द झाल्यामुळे २४ कोटी ३० लाख युरोची भरपाई करावी लागली.

साऊदम्प्टन - मॅंचेस्टर सिटी लढतीस विक्रमी ५७ लाख चाहते लाभले, असे सांगून दिलासा दिला जात आहे; पण अद्याप सगळी आकडेवारी बाहेर आली नसल्याचा इशारा दिला जात आहे. खेळाडूंच्या मानधनकपातीचा फटका नेमका किती, हे अद्याप जाहीर झालेले नाही. त्याशिवाय खेळाडूंची खरेदी विक्री, पुरस्कर्त्यांबरोबरील नव्या मोसमासाठी करार, प्रक्षेपक हक्कांची विक्री यावरील परिणाम दिसलेला नाही.

क्‍लबची खालावलेली ब्रॅंड व्हॅल्यू (सर्व रक्कम दशलक्ष डॉलरमध्ये)
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News

      क्‍लबचे नाव           २०२० 

२०१९

 रेयाल माद्रिद         १,५७२       १,८४६       
बार्सिलोना १,५६५        १,५६३
मॅंचेस्टर युनायटेड      १,४५६        १,६५१
लिव्हरपूल  १,३९८        १,३३६
मॅंचेस्टर सिटी        १,२४५        १,४०७
बायर्न म्युनिच         १,१६९        १,४७३
पीएसजी  १,०७१      

१,०२५

चेल्सी १,०५१       १,०८५
टॉटनहॅम हॉटस्‌पूर         ८६८          ८५०
आर्सेनल   ७९६         ९९३