माड्यावर माड्या, पुस्तकांच्या

डॉ. मारोती कसाब
Tuesday, 23 April 2019

पुस्तकांनो ,
कुठं गेला होता आम्हाला सोडून
तुमच्याशिवाय
गेल्या आमच्या हजारो पिढ्या मोडून...!

तुम्हाला वाचायची काय; तुमच्याकडे पहायचीही नव्हती
आम्हाला मुभा ...
तुमच्यातले बोल आले ओठी तेव्हा हासडल्यानं त्यांनी आमच्या जीभा..!

संबंधच येऊ दिला नाही त्यांनी 
तुमचा आमचा
म्हणून तर तोंड असूनही
बसली होती आमची वाचा

आमच्यातल्या तुकोबाने ओळखले तुमचे महत्त्व
हिंमत करुन रचली त्याने गाथा
म्हणूनच दोस्तहो 
तुम्हाला दिसतोय आज आमचा 
उजळ माथा

पुस्तकांनो ,
कुठं गेला होता आम्हाला सोडून
तुमच्याशिवाय
गेल्या आमच्या हजारो पिढ्या मोडून...!

तुम्हाला वाचायची काय; तुमच्याकडे पहायचीही नव्हती
आम्हाला मुभा ...
तुमच्यातले बोल आले ओठी तेव्हा हासडल्यानं त्यांनी आमच्या जीभा..!

संबंधच येऊ दिला नाही त्यांनी 
तुमचा आमचा
म्हणून तर तोंड असूनही
बसली होती आमची वाचा

आमच्यातल्या तुकोबाने ओळखले तुमचे महत्त्व
हिंमत करुन रचली त्याने गाथा
म्हणूनच दोस्तहो 
तुम्हाला दिसतोय आज आमचा 
उजळ माथा

आमच्या जोतिबाने केले जवळ तुम्हाला
म्हणूनच सोनियाचा दिवस आज उगवला

कालच तो सूर्य देऊन गेलाय आमच्या हाती पुस्तक 
यापुढे घडत जाईल आमचेही नीट मस्तक

पुस्तकांनो
आता बस झाल्या
तुमच्या लांड्या लबाड्या
सज्ज व्हा सत्यासाठी
लक्षात ठेवा
तुमच्यासाठीच बांधतोय आम्ही आता माड्यावर माड्या...!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News