सॅमसंग गॅलेक्सी वॉच3, बस्ड लाईव्ह फोनची बुकिंग सुरु; मिळणार बंपर ऑफर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 August 2020

सॅमसंग गॅलेक्सी वॉच बुकींग केल्यास बस्ड लाईव्ह स्मार्टफोन ४ हजार ९९० रुपयाला मिळेल. बस्ड लाईव्ह फोनची मुळ किंमत १४ हजार ९९० रुपये आहे.

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी वॉच तीन आणि बस्ड लाईव्ह स्मार्टफोनची भारतात नोंदणी सुरू झाली आहे. इ कॉमर्स, सॅमसंग ई स्टोर, सॅमसंग ओपेरा या ऑनलाईन प्लॉटफार्मवर ग्राहकांना बुकींग करता येणार आहे. ग्राहकांनी त्वरीत बुकींग केल्यास आकर्षक ऑफर मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी वॉच बुकींग केल्यास बस्ड लाईव्ह स्मार्टफोन ४ हजार ९९० रुपयाला मिळेल. बस्ड लाईव्ह फोनची मुळ किंमत १४ हजार ९९० रुपये आहे. त्याचबरोबर स्मार्ट वॉटवर ५ हजार रुपयाचा तत्काळ कॅशबॉग ऑफर देण्यात येणार आहे. ही ऑफर फ्लिपकार्ड, अॅमेझॉन आणि सॅमसंग शॉपवर मिळेल. मात्र याची बुकींग २६ ऑगस्ट पर्यंत करावी लागणार आहे. लिमिटेड काळासाठी ही ऑफर उपलब्ध आहे. 

गॅलेक्सी स्मार्ट वॉच

गॅलेक्सी स्मार्ट घड्याळाची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे. यामध्ये दोन प्रकार उपलब्ध आहेत एक ४ जीबी आणि दुसरा ब्लूटूथ. ४१ एमएम आणि ३५ एमएम अशा दोन साईजमध्ये घड्याळ मिळणार आहे. मिस्कील सिल्वर आणि मिस्कील काळा अशा दोन कलमध्ये वॉचेस उपलब्ध आहे. ४G मॉडेलची किंमत ३२ हजार ९९० आणि ४५ एमएम ४G मॉडेल ३८ हजार ९९० रुपयाला मिळणार आहे. भारतात हा घड्याळाची विक्री २६ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. बस्ड लाईव्ह स्मार्टफोन बिस्किट काळा आणि बिस्किट पाढरा दोन रंगात आहे. २५ ऑगस्ट पासून हा स्मार्टफोर विक्रीसाठी उपलब्ध होईल.  

सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी नोट वीस या सिरिज सोबत सॅमसंग गॅलेक्सी वॉच तीन हे घड्याळ लॅंच केले होते. या दोन्ही प्रोडक्टला ग्रहकांनचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ग्रांहकाना पुन्हा आकर्षिक करण्यासाठी कंपनीने खास ऑफर जाहीर केली. या ऑफरला ग्राहकांना कसा प्रतिसाद मिळतो येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News