'या' विद्यापीठाने निर्माण केले पुस्तक निर्जंतुकीकरण मशीन; वाचा कशी चालते?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 25 September 2020

द्यार्थ्यांना प्रत्यक्ष पुस्तक घेऊन वाचणे अवघड झाले. यावर नॉर्थ ईस्टर्न हिल विद्यापीठातील चमूने अभिनव कल्पना शोधून काढली. कोरोना व्हायरसपासून पुस्तकांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी एक मशीन तयार केले.

पुस्तक हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. 'पुस्तक हे मानवाचे मस्तक ठिकाण्यावर आणते'. कोरोनाचा संसर्ग पुस्तकांमधून वाढण्याचा मोठ्या प्रमाणात धोका आहे, त्यामुळे विद्यापीठे, महाविद्यालये आणि वाचनालये बंद करण्यात आली. त्यामुळे पुस्तके वाचण्यापासून वाचक दूर गेला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पुस्तक घेऊन वाचणे अवघड झाले. यावर नॉर्थ ईस्टर्न हिल विद्यापीठातील चमूने अभिनव कल्पना शोधून काढली. कोरोना व्हायरसपासून पुस्तकांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी एक मशीन तयार केले. या मशीनद्वारे पुस्तके निर्जंतुकीकरण करता येणार आहे. त्यामुळे पुस्तकाद्वारे होणारे कोरोना संक्रमन रोखणे शक्य आहे.

प्रा. डॉ. असीम सिन्हा यांच्या टीमने पुस्तके निर्जंतुकीकरण मशीन तयार केले. त्यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि सामाजिक विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. 'सर्व प्रकारचे वाचनीय पुस्तके निर्जंतुकीकरण करण्यात हे मशिन यशस्वी झाले आहे, निर्जंतुकीकरण करताना कोणत्याही प्रकारची हानी पुस्तकांना पोहोचली नाही, मोठ्या वाचनालयातील पुस्तके निर्जंतुकीकरण करण्यासाठी मशिनचा वापर केला जावू शकतो असा विश्वास डॉ. असीम सिन्हा यांनी व्यक्त केला. मशीनचा उपयोग करून विद्यापीठाची सर्व पुस्तके निर्जंतुकीकरण केली जाणार आहेत, त्यानंतर विद्यार्थ्यांना ती वाचण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील असे मत विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. एफ. आर. सुमेर यांनी व्यक्त केले. 

पुस्तके निर्जंतुकीकरण करण्यासाठी किती वेळ लागतो? 

एक पुस्तक निर्जंतुकीकरण करण्यासाठी वीस पैसे खर्च येणार आहे, 45 मिनिटात 150 पुस्तके निर्जंतुकीकरण केले जाऊ शकतात. भारतातील सर्व विद्यापीठांनी या मशिनचा वापर केल्यास, विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तक वाचण्यासाठी मिळू शकतात मात्र, विद्यापीठांनी मशीन खरेदी करण्याची इच्छाशक्ती दाखवायला हवी. दिवसेंदिवस लोप पावत चाललेली वाचन संस्कृती टिकवण्यसाठी या मशिनचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News