बोनस म्हणून काजू-बादाम देणाऱ्या बॉसला, ही बातमी नक्की दाखवा

यिनबझ टीम
Friday, 13 December 2019

बढतीच्या नावावर किटकिट करणारे आणि बोनस म्हणून तुम्हाला काजू-बादाम देणारे बॉस नक्कीच भेटले असतील, मग त्यांनी आता ही बातमी वाचा आणि जमलं तर 'जॉब धोक्यात नसलेला बघून' तुमच्या बॉसलाही ही बातमी वाचण्यासाठी शेअर करा.

अमेरिका - बढतीच्या नावावर किटकिट करणारे आणि बोनस म्हणून तुम्हाला काजू-बादाम देणारे बॉस नक्कीच भेटले असतील, मग त्यांनी आता ही बातमी वाचा आणि जमलं तर 'जॉब धोक्यात नसलेला बघून' तुमच्या बॉसलाही ही बातमी वाचण्यासाठी शेअर करा, कारण अमेरिकेच्या एका कंपनीमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना चक्क 70 करोडचा बोनस वाटलाय, तेही काजू-बादामसोबत.

अमेरिकन रियल एस्टेट कंपनीने आपल्या 198 कर्मचार्‍यांना भारतीय चलनानुसार 70 करोड रुपयांचा बोनस वाटला आहे. याची घोषणा कंपनीने एका पार्टीच्या दरम्यान केली आहे. पार्टीच्या दरम्यान कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना याची जाणीवही नव्हती, की त्यांना बोनस मिळणार आहे. मात्र अचानक त्यांच्या हतात काही लिफाफे आले आणि ते लिफाफे उघडताच त्यांच्या हातात जे चेक आले, ते पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला, त्यासाठी आधी हा व्हिडीओ पाहा...

रियल इस्टेट कंपनीने एका पार्टीच्या दरम्यान त्यांच्या कर्मचार्यांना काही लाल लिफाफे वाटले. त्याच्यात काय आहे, हे कोणालाच माहित नव्हतं. लिफाफे वाटून झाल्यानंतर सगळ्यांना एकदम ते लिफाफे उघडायला लावले.

लिफाफे उघडल्यानंतर सगळ्या कर्मचाऱ्यांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण या कंपनीने नविन कर्मचाऱ्यांसोबतच खूप जुन्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या आपेक्षेपेक्षा जास्त बोनस दिला होता. 

हे जरी सगळं बरोबर  असलं, तरी एक गोष्ट लक्षात राहू द्या, बोनस फुकट मिळत नसतो. त्यामागेदेखील अनेक कारणे असतात, त्यातील एक कारण त्या कंपनीच्या मालकानेच सांगितले आहे.

बोनस वाटण्यावर सेंट जॉन प्रॉपर्टीज कंपनीचे मालक लॉरेंस मेक्रांट्ज म्हणतात की...
कंपनीने 14 वर्षांमध्ये 200 लाख स्क्वेअर फूटमध्ये कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट केले. कंपनीसाठी ही सर्वात मोठी  गोष्ट आहे. हे यश मिळवण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांनी खूप मदत केली आहे. थैंक्सगिविंगच्या रूपात म्हणजेच त्यांचे आभार माणण्यासाठी त्यांना हा बोनस दिला आहे, तसेही ते कंपनीचा भाग आहेत आणि राहातीलच, असेही मत कंपनीच्या प्रेसिडंट यांनी मांडले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News