बॉलीवूड तारकांची ख्रिसमस पार्टी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 December 2019

संपुर्ण जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा कऱण्यात आला. त्याचप्रमाणे बाॅलिवूडमध्ये देखील त्याची धूम पाहण्यास मिळाली.

मुंबई : संपुर्ण जगभरात बुधवारी ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा कऱण्यात आला. त्याचप्रमाणे बाॅलिवूडमध्ये देखील त्याची धूम पाहण्यास मिळाली. अनेक  सेलिब्रेटींनी ख्रिसमस पार्टी केली. रणवीर कपूर, करिना कपूर, रणवीर सिंह, दिपीका, कुणाल खेमू, सोहा अली खान, सलमान खान, रितेश देशमुख, जेनिलिया देशमुख हे सर्व सेलिब्रेटी ख्रिसमस पार्टीत धूम करताना दिसले.

ख्रिसमसच्या निमित्ताने अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी मुंबईत त्यांच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. करण जोहर, रितेश देशमुख, तुषार कपूर, निखिल द्विवेदी, सोहेल खान, सलमान खान, सलीम खान, अरबाज खान, तुषार कपूर, एकता कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रेटी पार्टीत सहभागी झाले होते. 

तुषार मुलगा लक्ष्य कपूर आणि करण जोहर हा त्याची मुले यश आणि रुही बरोबर दिसला. विशेष म्हणजे तैमूर अली खानदेखील या पार्टीत पोहोचला. पण त्याचे वडील सैफ अली खान आणि आई करीना कपूर खान इथे हजर नव्हते. ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा कऱण्यात आला. त्याचप्रमाणे बाॅलिवूडमध्ये देखील त्याची धूम पाहिला मिळाली.

करिना कपूर आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या घऱी ख्रिसमस पार्टी केली. त्यांच्या यां पार्टीमध्ये बाॅलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. यामध्ये करिनाची बेस्ट फ्रेंड मलाइका अरोरा, अमृता अरोडा आणि बहीण करिश्मा कपूर या पार्टीत धूम करताना दिसल्या. तसेच या पार्टीमध्ये करण जोहर, आलिया भट देखील होते.

करण जोहरने या पार्टीमधील इनसाइड फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले. या फोटोंमध्ये हे सर्व सेलिब्रेटी धूम करताना दिसत आहेत. करण जोहरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये आलिया भट, करिष्मा कपूर, करिना कपूर, नताशा पुऩावाला  एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत.

सध्याची हिट आणि चर्चेमधील असणारे बाॅलिवूड कपल म्हणजे आलिया आणि रणबीर कपूर या पार्टीमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. या पार्टीमध्ये सारा अली खान आपल्या भावासोबत म्हणजेच इब्राहिम अली खान सोबत दिसली. त्यांनी या पार्टीमधील फोटो साराने आपल्या इस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News