बॉलिवूड निर्मात्याने केले ट्विट; सुशांत केसचा रिया एक मोहरा, मुंबई पोलिस- महाराष्ट्र सरकार 'या' कलाकारांना वाचवतय...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020

रिया चक्रवर्तीला रविवारी (ता. 30) सीबीआय समोर पुन्हा हजर केले जाईल आणि चौकशी सुरू होईल. या सर्व प्रकरणांमध्ये रियाला गोवले जात आहे. या प्रकरणाने मुख्य सुत्रधार चित्रपट क्षेत्रातील दिग्गज स्टार आहेत.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणांमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची प्रमुख रिया चक्रवर्तीला रविवारी (ता. 30) सीबीआय समोर पुन्हा हजर केले जाईल आणि चौकशी सुरू होईल. या सर्व प्रकरणांमध्ये रियाला गोवले जात आहे. या प्रकरणाने मुख्य सुत्रधार चित्रपट क्षेत्रातील दिग्गज स्टार आहेत. त्यांना मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा खळबळजनक खुलासा सुप्रसिद्ध निर्माता विवेक अग्निहोत्री यांनी एका ट्विटरद्वारे केला आहे.

 

विवेक अग्निहोत्री ट्विटमध्ये लिहल आहे की, एका फार्म हाऊसवर सुशांत सिंग राजपूत आणि एक कलाकार यांच्यात वाद झाला. तर दिग्गज कलाकारांने वादाला सुरू केल. सुशांत सिंग कलाकारावर भारी पडू लागला तेव्हा त्या कलाकाराने सुशांतला धमकी दिली. तुझं करिअर संपून टाकेन, ज्याप्रमाणे मी अनेकांचं करिअर संपवले आहे, त्यामुळे चित्रपट सृष्टीतील काही दिग्गज कलाकार सुशांसिंग प्रकरणाचे मुख्य सुत्रधार आहेत, त्याला महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिस वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. असे अग्निहोत्रीने लिहिले आहे.

'द ताश्कंद फाईल' आणि 'दना दन दन गोल' या चित्रपटाचा निर्माता विवेक अग्निहोत्री त्यांनी केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सुशांत सिंग राजपूतने 34 व्या वर्षी देशाला अलविदा केले. काय पो चे या चित्रपटामुधन सुशांत सिंग बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. नंतर एम. एस. धोनी या चित्रपटाने सुशांतला प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र बॉलिवूडमध्ये ज्याचा बाप असतो त्यांना सहज प्रवेश मिळतो. ज्याच्या मागे कोणीही नसते त्यांना बॉलिवुडमध्ये तारेवरची कसरत करावी लागते असा दावा काही कलाकारांनी केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News