अपुर्वा नेमळकरचे बोल्ड फोटो सोशल मीडियावरती व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 13 September 2020

अपुर्वा नेमळकरचे बोल्ड फोटो सोशल मीडियावरती व्हायरल

अपुर्वा नेमळकरचे बोल्ड फोटो सोशल मीडियावरती व्हायरल

अनेकदा कलाकार आपली प्रसिध्दी आणि इतरांच्या तुलनेत वेगळेपण जपण्यासाठी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. तशीच झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली शेवंता म्हणजे अपुर्वा नेमळकर सुध्दा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अपुर्वा नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याचबरोबर तिच्या फोटोंना कॅप्शन सुध्दा वेगळी असतात. नुकतेच तिने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावरती शेअर केले आहेत. त्यामुळे तिची अधिक चर्चा होऊ लागली आहे.

अपुर्वाने पांढ-या रंगाचे वेस्टर्न वेअर घालून फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरती फोटोला लाईक आणि शेअर मोठ्या प्रमाणात केले आहे. शेअर केलेले फोटो बोल्ड आहेत, त्याचबरोबर ते तिच्या चाहत्यांना अधिक आवडले आहेत. विशेष म्हणजे या पोस्टला ड्रेसिंगचा आनंद एक कला असं म्हटलं आहे.

आत्तापर्यंत अपुर्वाने सोशल मीडियावरती अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. काही आठवणी तिच्या लहानपणीच्या आहेत, तर काही आत्ताच्या आठवणी आहेत. सोशल मीडियावर एकादी पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून अपूर्वाला अनेक प्रश्न विचारले जातात. रात्रीस खेळ चाले या मालिकेतील एका पात्रामुळे अपुर्वाच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली असं म्हणायला हरकत नाही.

अपुर्वाने आभास या मालिकेतून आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यानंतर भाखरवाडी ६ किमी आणि इश्कवाला लव्ह या चित्रपटांमध्ये सुध्दा काम केलं आहे. तसेच अपुर्वाचं शिक्षण मुंबईतल्या वांद्रे आणि रूपारेल कॉलेजमध्ये झालं आहे. कॉलेजमध्ये असताना तिला मालिकेसाठी विचारण्यात आलं होतं. परंतु शिक्षणामुळे तिनं मालिका नाकारली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News