बॉडी बनवणारी जिम ठरू शकते; शरीरासाठी धोकादायक
- तुम्ही जर हार्डवर्क करताना स्वतः ची काळजी घेतली नाही तर हे तुमच्यासाठी जीव घेणं ठरू शकतं. अशीच एक घटना नोएडामध्ये घडली आहे.
नोएडा: २४ वर्षीय तरुणाचा जिम मध्ये ट्रेडमिल वर धावताना मृत्यू. फिटनेस राहण्यासाठीअलीकडे जिमला जाण्याची क्रेझ फारच वाढलेली पाहायल मिळते. परंतु गंभीर किंवा अवघड एक्सरसाइज करताना किती लोक स्वतः ची पुरेशी काळजी घेतात? तुम्ही जर हार्डवर्क करताना स्वतः ची काळजी घेतली नाही तर हे तुमच्यासाठी जीव घेणं ठरू शकतं. अशीच एक घटना नोएडामध्ये घडली आहे. या घटनेतून एकच बाब करायला हवी की, एक्सरसाइज करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
नोएडा येथील जिममध्ये एक व्यक्ती ट्रेडमिलवर धावत होती. अचानक ही व्यक्ती चक्कर येऊन पडली आणि बेशुद्ध झाली. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या तरूणाला हार्ट अटॅक आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये राहणारा २४ वर्षीय यश उपाध्याय आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. इंजिनिअरींग केल्यानंतर तो नेटवर्किंगचा कोर्स करण्यासाठी एक महिन्याआधी नोएडा सेक्टर ७६ मधील जेएम ऑर्किड सोसायटीमध्ये मावशीकडे राहत होता.
मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, यश रोज सकाळी सोसायटीतील क्लबच्या जिममध्ये एक्सरसाइज करण्यासाठी जात होता. बुधवारी सकाळी त्याला वेळ मिळाला नाही, त्यामुळे तो सायंकाळी साडेसात वाजता जिमला गेला. तेथे एका ट्रेडमिलवर धावू लागला. अचानक त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी चालू आहे.
एक्सरसाइज करताना कोणती काळजी घ्यावी
- रात्री एक्सरसाइज करणं गरजेचं असेल तर भात, मांस, डाळ आणि तळलेले पदार्थ खाणं टाळा.
- जेवण केल्यावर २ तासांनी एक्सरसाइज करावी, नाही तर पोटात वेदना किंवा पोट टाइट होण्याची समस्या होऊ शकते.
- वर्कआउट आधी ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे. झोपेतून उठल्यावर एक तासानंतर जिमला जावे.
- एक्सरसाइज करण्याच्या अर्धा तास आधी अर्धा लिटर पाणी प्यावं. तसेच एक्सरसाइज करताना दर १५ मिनिटांनंतर ४ ते ५ घोट पाणी सेवन करा.
- रात्रीच्या वेळी शरीर थकलेलं असतं, अशावेळी एक्सरसाइज केल्याने ब्लड प्रेशर वाढण्याचा आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
- अनोशा पोटी एक्सरसाइज अजिबात करू नका. एक्सरसाइज करण्याआधी फळं किंवा ड्राय फ्रूट्सचं सेवन करावं.