Board Exam: कमी वेळात करा जास्त अभ्यास, मिळवा चांगले मार्क

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

कमी वेळात जास्त अभ्यास करुन चांगले मार्क मिळविण्याच्या काही टिप्स आम्ही सांगणार आहोत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्की होईल.

सध्या सीबीएसई, आयसीएससी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षेत चांगले मार्क मिळविण्यासाठी विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत आहेत. काही विद्यार्थी रात्रभर अभ्यास करुनही परीक्षेच्या वेळी काहीच लक्षात राहत नाहीत. त्यामुळे अभ्यास केलेल्या पाठाचे रिव्हीजन करणे महत्त्वाचे आहे. बोर्डाचा पेपर लिहतांना वाचलेले लक्षात राहील आणि चांगले मार्क मिळण्यास मदत होईल. कमी वेळात जास्त अभ्यास करुन चांगले मार्क मिळविण्याच्या काही टिप्स आम्ही सांगणार आहोत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्की होईल.

पाठाचे वर्गीकरण

पेपरच्या एक दिवस आधी विद्यार्थ्यांनी किती टॉपीक वाचले आहेत आणि किती शिल्लक आहेत याचे सविस्तर दोन भागात विभागणी करावी. जे महत्वाचे धडे आहेत त्याचे चांगल्या प्रकारे रिव्हीजन करा त्यामुळे महत्त्वाच तेवढचं लक्षात राहील.

वेळेचे व्यवस्थापन

दिवसातून आठ तास विद्यार्थी अभ्यास करत असेल तर त्यातला एक तास जुने पेपर सोडवण्यासाठी काढावा. त्यामुळे पेपर पॉटर्न आणि पश्न पत्रिका विद्यार्थ्यांना कळेल. बाकीचे सात तास अभ्यास आणि रिव्हीजन करावे.  

महत्त्वाचे पॉइंट काढून वाचन 

परीक्षेच्या काही वेळा आधी एखादा टॉपीक विद्यार्थ्यांना आठवायचा असेल तर टॉपीकचे महत्त्वाचे पॉइंट काढून जोर जोरात वाचन करावे, त्यामुळे कमी वेळात टॉपीक आठवणीत राहील. 

मोबाईल आणि इंटरनेटवर पासून दूर

अभ्यास करतांना अनेक विद्यार्थी मोबाईल आपल्या सोबत बाळगतात. त्यामुळे विद्यार्थी मन लावून अभ्यास करु शकत नाहीत. विद्यार्थ्यांचे मन विचलीत होतो. खुप अभ्यास करुनही परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या लक्षात काहीचं राहत नाही. त्यामुळे परीक्षा कालावधिक विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इंटरनेटवर पासून दूर रहावे. 

अभ्यास करताना मध्ये- मध्ये वेळी ब्रेक

परीक्षेच्या कालावधितमध्ये विद्यार्थी खुप टेन्शन घेतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागत नाही आणि व्यवस्थित रिव्हीजन करु शकत नाहीत. परीक्षेच्या एक दिवस आधी विद्यार्थ्यांनी रिल्याक्स झाले पाहीजे. सकारात्मक विचार केला पाहीजे. नविन टॉपीक वाचण्यापेक्षा वाचलेल्या टॉपीकचे रिव्हीजन केले पाहीजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले मार्क मिळतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News