Board exam: परीक्षेपासून वाचण्यासाठी तरुणाने केले भावाचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

बोर्डाच्या परीक्षेपासून वाचण्यासाठी तरुणाने आपल्या चुलत भावाचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी मध्ये प्रदेश राज्यातील मुजेरा जिल्ह्याच्या तुदीरा गावात घडली.

सध्या सीबीएसई, आयसीएससी आणि विविध राज्यातली बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वच्या टर्निग पॉइंट असतात. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेचं विद्यार्थ्यांना खुप टेन्शन येते. परीक्षेत चांगले मार्क मिळावे यासाठी विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करतात, मात्र अभ्यास करुनही परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या लक्षात काहीच राहत नाहीत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेपासून वाचण्यासाठी तरुणाने आपल्या चुलत भावाचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी मध्ये प्रदेश राज्यातील मुजेरा जिल्ह्याच्या तुदीरा गावात घडली.

हे ही वाचा-  Board Exam: कमी वेळात करा जास्त अभ्यास, मिळवा चांगले मार्क

आज मंगळवारी मध्ये प्रदेश बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या. बोर्डाच्या परीक्षेपासून वाचण्यासाठी 18 वर्षीय तरुण रनबीरने आपल्या चुवत भावाचे अपहरण केले, भावाचे हात पाय बांधून शेतमाध्ये फेकुन दिले. आईने आपल्या मुलागी शोधाशोध केली मात्र, मुलगा सापडला नाही. शेवटी हरवलेल्या मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ चौकशी केली. लहान मुलगा शेतामध्ये रडत बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळावी. पोलिसांनी लहान मुलाल ताब्यात घेऊन आईच्या स्वाधीन केले.

अपहरण केल्याच्या ठिकाणीवरुन पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली. 'लहान मुलांला शोधण्यासाठी रनबीरला एका विशेष ठिकाणी पाठवा' असे असे चिठ्ठीत लिहले होते. अशी माहिती पोलीस अधीक्षक असित यादव यांनी दिली. पोलिसांनी रनबीरची कसून चौकशी केल्यानंतर रनबीरने धक्कादायक खुलासा केला.

रनबीर म्हणाला '12 वी बोर्डाच्या परीक्षेची खुप भीती वाटत होती. परीक्षेपासून वाचण्यासाठी चुलत भावाचे हात पाय बांधून शेतात फेकुन दिले आणि एक चिठ्ठी लिहून अपहरणाच्या ठिकाणी ठेवली. चिठ्ठी वाचून चुवत भावाला सोधण्यासाठी मला पाठवले जाईल त्यामुळे मी परीक्षेपासून दूर राहील' असे रनबीर म्हणाला. 

पोलिसांनी रनविर विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे आणि पालकांनी मुलांना जबरदस्तीने परीक्षेला पाठवु नये अशा सुचना दिल्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News