Board Exam 2020 बोर्डाच्या परीक्षेदरम्यान येणारा ताण 'असा' दूर करा...

यिनबझ टीम
Monday, 17 February 2020

बोर्डाच्या परीक्षेची भीती अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम घडवून आणते. अनेक वेळा प्रयत्न करूनही ताण कमी होत नाही, अशा परिस्थितीत काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टींची काळजी घेत परीक्षेची चिंता कमी केली जाऊ शकते.

नवी दिल्ली: सध्या बोर्डाच्या परीक्षेची चर्चा सुरू झाली आहे. काही विद्यार्थी अजूनही तयारीमध्ये व्यस्त आहेत तर काही विसरण्याबद्दल घाबरत आहेत. काही ठिकाणी रिवीजन करताना विद्यार्थी गडबडून जात आहेत तर काही ठिकाणी एखाद्या विषयाच्या न समजल्याने अनेक विद्यार्थी तणावात आहेत. कारण काहीही असू शकते, बहुतेक प्रत्येक विद्यार्थी बोर्ड परीक्षेबद्दल थोडेसे चिंतेत असतोच. जोपर्यंत हा ताण मर्यादित आहे तोपर्यंत तो ठीक आहे परंतु काहीवेळा तो ताण इतका वाढतो की त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि नंतर तो गुणपत्रकावर दिसून येतो.

आज आपण बोर्ड परीक्षेदरम्यान आणि त्यापूर्वी होणारे तणाव आणि चिंता कशी कमी करावी, याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. परीक्षेच्या ताणाबद्दल बोलताना शिक्षण सल्लागार डॉ. अमिता वाजपेयी म्हणतात की मुलांच्या परीक्षेचा ताण कमी करण्यात पालक महत्त्वाची भूमिका निभावतात. मुलांना असलेला ताण काहीवेळा मुले व्यक्त करत नाहीत, मात्र पालकांचे अनेक प्रकारचे शब्द आणि वागणे विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम घडवून आणत असतात.

त्याच प्रकारे, पालकांच्या एंजियोग्राफीचा थेट परिणाम मुलांवर होतो, बर्‍याच पालकांना ही गोष्ट माहित नसते. म्हणूनच सर्व प्रथम, पालकांनी स्वत:ची चिडचिडी कमी करणे गरजेचे आहे. बोर्ड परीक्षेबद्दल मुलांच्या मनात कोणत्याच प्रकारची भिती घालू नये, मुलांना समजावून सांगा की ही बोर्ड परिक्षा म्हणजे आयुष्यातील सगळ्यात शेवटची परिक्षा नाही किंवा जीवन मरणाची परिक्षा नाही. पालकांनी आधी शांत मनाने आणि कोणत्याही दबावाशिवाय विद्यार्थ्यांची घरगुती चाचणी घेण्यास सुरूवात करावी. विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवावा, पालकांच्या तोंडून निघालेल्या अनेक शब्दांचा मुलांवर थेट परिणाम होतो, काही विद्यार्थी शेवटच्यावेळी बाहेरच्यांचे ऐकणे सोडून देतात आणि पालक म्हणतील तेच करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परिक्षेबद्दलचा तणाव कमी करण्यात पालकांची सर्वात मोठी भुमिका असते.

परीक्षेच्या वेळी, सामान्य मुले असा विचार करतात की फक्त दिवस रात्र अभ्यास करणे आणि इतर गोष्टींना नंतर वेळ देणे. त्यामुळे इतर गोष्टी जरी तुम्ही दूर करत असाल तरी व्यायामासाठी ही योग्य वेळ आहे. दिवसातून किमान 15 मिनिटे आपल्या आवडीनुसार व्यायाम करा. चालणे, पोहणे, नृत्य, योगा, कार्डिओ, ट्रेडमिल तुम्हाला जे शक्य होईल ते करा. यामुळे शरिरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होईल. मेंदूला चालना मिळेल. अनेक पेशींची हालचाल होईल.

शारीरिक व्यायामाच्या बाबतीतही असे होते की मनाला शांत ठेवण्यासाठी काही व्यायाम केले जातात; ज्याचा प्रयत्न येथे केला जाऊ शकतो. याबद्दल बोलताना क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. आराधना गुप्ता सांगतात की परीक्षेच्या वेळी मुलांचा ताण येणे, नैसर्गिक आहे. त्याला टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासह आपण टनेल व्हिजन आणि उर्वरित व्यायाम देखील करुन पाहू शकता. काही व्यायाम एका जागी बसल्यावर किंवा अभ्यास करता करतादेखील करू शकता, त्यामुळे तुम्हाला जाणवत असलेला थकवा दूर होईल, म्हणजेच हळूवार मान फिरवणे, हाताचे तळवे एकमेकांवर घासणे, हात फिरवणे, खुर्चीवर बसला असाल तर पाय हालवणे इत्यादी.

अभ्यासादरम्यान ब्रेक घेतल्याने केवळ मनालाच नाही तर मेंदूलाही काहीसा आराम मिळतो. 10 मिनिटांचा ब्रेक घेतल्याने नंतर मेंदूची कार्यक्षमताही वाढते. याबद्दल बोलताना जनरल फिजिशियन आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उन्नती कुमार म्हणतात की, थोडा वेळ आराम केल्याने आपली उत्पादकता वाढेल. पालकांनी मुलाला वेळेवर खाणे, पिणे आणि झोपायला देणे महत्वाचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News