कर्नाळ्यात ब्ल्यू मॉरमॉनची मखमली चादर!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 11 October 2019

पावसाळा सरल्यानंतर ब्ल्यू मॉरमॉन मोठ्या संख्येने येतात. कर्नाळा अभयारण्य तर या फुलपाखरासाठी प्रसिद्ध आहे. या वनराईत नानाविध प्रकारची फुलझाडे आहेत. त्यामुळे या कीटकासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या संख्येने प्रजनन होते.

कर्नाळा- निसर्गातील विविधतेने नटलेले कर्नाळा पक्षीअभयारण्य सध्या मखमली काळ्या रंगाने न्हाऊन निघाले आहे. या परिसरात हजारोंच्या संख्येने असलेल्या ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखरामुळे ही रंगांची उधळण झाली आहे. निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी ठरत असून ते मोठ्या संख्येने येत आहेत. ही संधी आणखी किमान दोन आठवडे आहे.

पावसाळा सरल्यानंतर ब्ल्यू मॉरमॉन मोठ्या संख्येने येतात. कर्नाळा अभयारण्य तर या फुलपाखरासाठी प्रसिद्ध आहे. या वनराईत नानाविध प्रकारची फुलझाडे आहेत. त्यामुळे या कीटकासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या संख्येने प्रजनन होते.

ब्ल्यू मॉरमॉनची छबी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. अभ्यास करण्यासाठी येणाऱ्यांची गर्दीही आहे.

मित्र कीटक म्हणून ब्ल्यू मॉरमॉनची ओळख आहे. विशिष्ट जातीचे फुलपाखरू विशिष्ट जातीच्याच झाडांवर अंडी घालतात. त्यानुसार या फुलपाखराचेही प्रजनन होते.

फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेच तिला हवे असलेले झाड शोधते. त्यावर अंडी घालते, अशी माहिती पक्षी निरीक्षक ओमकार खरात यांनी दिली. महाराष्ट्रात २२५ प्रजाती आहेत.भारतातील एकूण फुलपाखरांच्या संख्येपैकी १५ टक्‍के फुलपाखरे एकट्या महाराष्ट्रात आहेत. ‘ब्ल्यू मॉरमॉन’  हे ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून आहे. २२ जून २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने ही घोषणा केली होती, अशी माहितीही खरात यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News