तरुणींमध्ये "या" रंगाची क्रेझ

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 14 October 2019

प्रत्येक शेड हा वेगळा लुक देतो. डेट, आऊटिंग, हॉलिडे प्लॅन करणार असाल तर निळ्या रंगातील वन पीस तुम्ही निवडू शकता. शॉर्ट वनपीसवर पांढऱ्या रंगाचे बूट आणि सनग्लासेस हे कॉम्बिनेशन खूप छान दिसते.

प्रसंग कोणताही असो निळा रंग एक वेगळाच लुक देतो. या रंगाची मागणी नेहमीच वाढताना दिसते. ऑफिसला जाणाऱ्यांसाठी हा रंग काही नवा नाही. फक्त तो कोणत्या पद्धतीने घालता, यावर तुमचा लुक अवलंबून असतो. सध्या निळ्या रंगाची क्रेझ जरा जास्तच दिसते. यामधील प्रत्येक शेड हा वेगळा लुक देतो. डेट, आऊटिंग, हॉलिडे प्लॅन करणार असाल तर निळ्या रंगातील वन पीस तुम्ही निवडू शकता. शॉर्ट वनपीसवर पांढऱ्या रंगाचे बूट आणि सनग्लासेस हे कॉम्बिनेशन खूप छान दिसते.

निळ्या रंगाचा शॉर्ट किंवा लाँग जंपसूट नेहमीच आकर्षक दिसतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाँग किंवा शॉर्ट जंपसूट निवडू शकता. तुम्हाला स्टाईल आयकॉन बनवणारा हा जंपसूट नेहमी कमरेमध्ये फिट असावा. त्यावर बेल्ट असल्यास तो आणखी छान दिसतो. यावर बॅग, ॲक्सेसरीज, बुट किंवा सॅण्डल यांचा रंग काँट्रास्ट असेल याची काळजी घ्या.

निळ्या रंगाचे शॉर्ट ब्लेझर तुम्ही अनेक प्रकारच्या वेस्टर्न कपड्यांसोबत घालू शकता. या प्रकाराचे ब्लेझर तुम्ही प्लाझोवर किंवा टॉपसोबत घालू शकता. निळ्या रंगाचा कोणताही शर्ट, मग तो कॉर्टन असो वा लिनन तो कोणावरही खुलूनच दिसतो. निळ्या रंगाच्या शर्टवर राखाडी रंगाच्या पॅन्टचे कॉम्बिनेशन छान दिसते. रात्रीच्या पार्टीसाठी जाणार असाल तरीही निळा रंग कधीही योग्यच. यामध्ये गडद निळ्या रंगाचा ब्लेझर तुम्ही स्कर्टवर घालू शकता. गाऊन, टी-शर्ट, वनपीस असे अनेक निळ्या रंगातले पर्याय तुम्ही पार्टीसाठी घालू शकता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News