जीवनदीप महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न 

दिव्येश जाधव
Friday, 28 February 2020

रक्तदान कार्यक्रमात 52 बॅग संकलित करण्यात आल्या. सर्व प्राध्यापक वर्गाने देखील रक्तदान केले.

खर्डी : जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी येथे आज (दि.२८) राष्ट्रीय सेवा योजना विभाग व लॉयन्स क्लब ऑफ मिलेनियम, नायर(हॉस्पिटल) आयोजित रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे अध्यक्ष मा.श्री.रविंद्र घोडविंदे (जीवनदीप.शै.संस्था.अध्यक्ष) व महाविद्यालयाचे प्रा.प्राचार्य.के.आर.कळकटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग दर्शवून रक्तदान केले. कार्यक्रमचे अधिकारी प्रा.किशोर पवार,प्रा.अपर्णा जाधव,प्रा.प्रियांका पवार यांनी देखील आपला सहभाग दर्शवला. विद्यार्थ्यांनी आपले रक्त कोणाच्यातरी उपयोगी पडेल व त्यातून कोणाचा तरी जीव वाचेल या भावनेतून आपले कर्तव्य पार पडले."रक्त दान हे सर्वांत श्रेष्ठ दान " असते  हे विद्यार्थ्यांना सांगितले गेले. रक्तदान कार्यक्रमात 52 बॅग संकलित करण्यात आल्या. सर्व प्राध्यापक वर्गाने देखील रक्तदान केले. लॉयन्स क्लब ऑफ मिलेनियम,नायर(हॉस्पिटल) यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News