काळाकिल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 July 2020
  • आजची एकसंध दिसणारी मुंबई ही पूर्वी सात बेटांचा समुह होती.
  • ही बेटे ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी आपले पारंपारिक शत्रू सिध्दी, मराठे, पोर्तुगिज ह्यांच्या पासून मुंबईचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले.

आजची एकसंध दिसणारी मुंबई ही पूर्वी सात बेटांचा समुह होती. ही बेटे ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी आपले पारंपारिक शत्रू सिध्दी, मराठे, पोर्तुगिज ह्यांच्या पासून मुंबईचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले. त्यापैकी मिठी नदीवर धारावी येथे बांधलेल्या किल्ल्याला स्थानिक लोक काळ किल्ला म्हणून ओळखतात.

 इ.स. १७३७ मध्ये मुंबईचे गव्हर्नर गेराल्ड ऑन्जीअर ह्याने मिठी नदी काठी किल्ला बांधला. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्त्वे पोर्तुगिजांच्या सालशेत बेटावर आणि मिठी नदीवर नजर ठेवण्यासाठी केला गेला. हा किल्ला काळ्या दगडात बांधला गेला असल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये काळा किल्ला ह्या नावाने ओळखला जातो. माहीम किल्ला, काळा किल्ला, रिवा किल्ला, सायनचा किल्ला या चार एका रांगेत असलेल्या किल्ल्यांमुळे मुंबी बेटाची उत्तर बाजू संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत झाली होती.

 सदर किल्ला जगप्रसिध्द धारावी झोपडपट्टीत असल्यामुळे सर्व बाजूंनी अतिक्रमणाने वेढलेला आहे. आता अस्तित्वात असलेल्या अवशेषात प्रथम दर्शनी काळ्या दगडात बांधलेली किल्ल्याची भिंत आणि त्यावरील किल्ला १७३७ साली बांधल्याची दगडात कोरलेला शिलालेख दिसतो. किल्ल्याच्या आत जाण्यासाठी ८ फूट भिंत चढून जावी लागते. किल्ल्याचा आतील भाग कचऱ्याने भरलेला आहे. त्यातून प्रवेशव्दार भरलेला आहे. त्यातून प्रवेशव्दार, जीना आणि फांजी यांचे अवशेष दिसतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News