बीकेसीत आतापर्यंतची सर्वात महागडी प्रॉपर्टी डिल पार पडली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

लॉकडाऊनचा मालमत्ता क्षेत्रालाही चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. मात्र, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍समध्ये नुकतीच अलीकडच्या काळातील सर्वात महागडी प्रॉपर्टी डिल पार पडली आहे.

मुंबई : लॉकडाऊनचा मालमत्ता क्षेत्रालाही चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. मात्र, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍समध्ये नुकतीच अलीकडच्या काळातील सर्वात महागडी प्रॉपर्टी डिल पार पडली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील एका कंपनीने बीकेसीत साडेसात हजार चौरस फुटांचे कार्यालय 30 कोटींत खरेदी केले आहे. एकूण किंमत कमी असली तरी या कंपनीने एका चौरस फुटासाठी तब्बल 40 हजार रुपये मोजले आहेत. आतापर्यंतचा बीकेसीतील हा सर्वात महागडा दर मानला जात आहे.

गार्डीयन रियल इस्टेट अँडवायजरी या कंपनीने ही खरेदी केली आहे. कंपनीचे या कॉम्प्लेक्‍समध्ये भाडेकरारावर घेतलेले कार्यालय होते. मात्र, त्याची मुदत संपल्यामुळे कंपनीने अक्षय तृतीयेच्या दिवशी हा व्यवहार केला. कंपनीने यातील 70 टक्के रक्कम अदा केली असून, नवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या कार्यालयात शिफ्ट होणार असल्याचे कंपनीचे संचालक कौशल अग्रवाल यांनी म्हटले आहे.

370 हेक्‍टर परिसरात पसरलेले बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्‍स हे जागतिक वित्तीय केंद्र असून जगातील आणि देशातील सर्व प्रमुख बॅंकिंग, नॉन बॅंकिंग, वित्तीय कंपन्यांची कार्यालये येथे आहेत. बॅंक ऑफ अमेरिका, फेसबुक, मेरील लिंच, ऍमेझॉन, सिसको, सेबी, सर्व राष्ट्रीयीकृत आणि खाजगी बॅंकिंग कंपन्यांची मुख्य कार्यालये बीकेसी परिसरात आहेत. मुळातच या कॉम्प्लेक्‍समध्ये कुणी मालमत्ता विकत नाही. त्यामुळे हा दर योग्य असल्याचे मालमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबईतील महागडी खरेदी
यापूर्वी लॉकडाऊन काळातच मुंबईमध्ये रहिवासी भागातील सर्वात मोठी प्रॉपर्टी डील नोंदवण्यात आली होती. प्रभादेवी भागात उद्योगपती निरज कोचर यांनी दोन डुप्लेक्‍स अपार्टमेंट 138 कोटी रुपयांत खरेदी केले होते. या व्यवहाराकरीता कोचर यांनी केवळ स्टॅम्प ड्युटीपोटी 8.17 कोटी रुपये भरले होते. हा फ्लॅट प्रतिचौरस फूट 64,879 रुपये या दराने मिळाला होता.

बीकेसीतील मोठ्या डिल
कंपनी जागा किंमत
सुमीटोमो ग्रुप- 6,99,400 चौरस फूट प्लॉट, 2,238 कोटी रुपये
दर- 32,500 प्रति चौरस फूट

ब्लॅंकस्टोन- 7,00,000 चौरस फूट जागा, 2600 कोटी रुपये
दर- 37,000 प्रति चौरस फूट

व्रिहीस प्रॉपर्टी समूह- जेट एयरवेजचे दोन मजले, 490 कोटी
दर - 29,000 चौरस फूट

सिटी बॅंक ग्रुपने 36,500 प्रति चौरस फूट या दराने 400 कोटीत प्रॉपर्टी खरेदी केली
सेबीने 3 लाख चौरस फूट क्षेत्रफळ जागा 900 कोटींत खरेदी केली

मुंबईतल्या इतर महागड्या प्रॉपर्टी डिल

  • निरज कोचर यांनी प्रभादेवीत दोन डुप्लेक्‍स अपार्टमेंटची 136.27 कोटीत खरेदी
  • निरज बजाज यांची वरळीत 120 कोटी रुपयांत अपार्टमेंट खरेदी
  • गोदरेज प्रॉपर्टीने आर. के. स्टुडीओच्या जागेकरीता 250 कोटी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News