पवारांना शह देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन; कट्टर विरोधकालाच देणार पालकमंत्रीपद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेल्यावर पुण्याचा पालकमंत्री कोण याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे 
  • शरद पवारांना हरवण्यासाठी भाजपची  विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु 

पुणे - पुण्यातुन  गिरीश बापट खासदार म्हणून निवडुन आले आणि आता  पुण्याचं पालकमंत्री पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . यासाठी दोन नावांची चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत  भाजपला पुणे  जिंकायचं असेल तर जिल्ह्यातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व कमी करावं लागेल.

यासाठी शरद पवारांना हरवण्यासाठी भाजपने पालकमंत्री म्हणून दिग्गज नाव पुढे केले आहेत.  होणार पालकमंत्री जरी  भाजप ठरवणार आहे मात्र शरद पवारांना टक्कर देणार नावाचं त्यांना द्यावं लागेल. त्यासाठी भाजपने  आपली रणनीती आखण्यास सुरवात केली आहे .

राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष्य याना टक्कर देण्यासाठी भाजप पुण्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचं नाव पुढं करणार असल्याचं समजत. पवारांना हरवायचा असेल तर दिग्गज नाव पुढं करावं लागेल. लोकसभे मध्ये ही पुण्याची जबाबदारी चंद्रकांत पटलावर होती. त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांची निवड होण्याची शक्यता असल्याचं कळत . परंतु  पुण्याच्या भाजप मधील नेत्यांमध्ये मंत्रावेगळ्याच नावाची चर्चा असल्याचं कळते . 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News