भाजपचा हा नेता म्हणतोय; महिला अश्लील व्हिडीओ तयार करायला घाबरत नाही  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांचं हे वक्तव्य देशभर व्हायरल झाल्याने त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. तसेच पश्चिम बंगालचे नगरविकास मंत्री हकीम यांनी असभ्य घोष अशा पध्दतीची टीका केली आहे

कोलकाता - महिला अश्लील व्हिडीओ तयार करत असताना आणि ड्रग्जचे सेवन करताना व्हिडीओ बनवायला अजिबात घाबरत नाहीत असं खळबळजनक वक्तव्य पश्चिम बंगालच्या अध्यक्षांनी केल्याने त्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी महिलादिनी रविवारी कार्यक्रमात असं वक्तव्य केलं. त्यानंतर महिला सन्मान, स्वाभिमान आणि मुल्ये सुध्दा विसरत आहेत, याबाबतची चिंता सुध्दा घोष यांनी कार्यक्रमात बोलून दाखविली. 

सुरूवातीला मेदीनीपूरच्या खासदारांनी नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलने करणा-या महिला आंदोलकांवरती जोरदार टीका केली. आंदोलन करण्यासाठी काही महिलांना रस्त्यावर बसवले जाते. ही चुकीची गोष्ट आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून ही अशी आंदोलने होत आहेत हे दुर्देव आहे. 

पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांचं हे वक्तव्य देशभर व्हायरल झाल्याने त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. तसेच पश्चिम बंगालचे नगरविकास मंत्री हकीम यांनी असभ्य घोष अशा पध्दतीची टीका केली आहे. महि्ला दिनी असं वक्तव्य केल्याने देशभरातील महिलांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून घोष यांच्यावर टीका केली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News