फडणवीस यांचे 'टरबुज्या' हे नाव सर्वश्रुत होण्यामागे भाजपाचे नेते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 June 2020

भाजपमध्ये विशेष म्हणजे नाव आणि अडनाव एकत्र करून छोटं नाव वापरण्याची पध्दत आहे. नरेंद्र मोंदीना 'नमो' म्हणतात, तर अमित शहांना 'मोटाभाई' म्हणतात तसेच चंद्रकांत पाटलांना 'चंपा' म्हणत असावेत असाही टोला त्यांनी लगावला. 

महाराष्ट्र - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भाजपवरती एका पत्रकातून जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पडळकरांवरती आणि भाजपच्या या भूमिकेवरती टीका केली. तसेच गोटे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्याबाबत एक खुलासा केला आहे. फडणवीस यांचे 'टरबुज्या' हे नाव सर्वश्रुत होण्यामागे भाजपाचे नेते असल्याचा दावा अनिल गोटे यांनी केला आहे. 


 

भाजपातील अन्य नेत्यांचे बारसं करायची संधी, त्यांच्या पक्षातील एकाही नेत्याने शिल्लक ठेवली नसल्याचा दावा अनिल गोटे यांनी पत्रकामधून केला आहे. भाजप नेत्यांमध्ये एकामेकांबद्दल इतका आदर आहे की, त्यांनीच एकमेकांचं बारसं केलं आहे. भाजपमधील फडणवीसांच्या विरोधातील एक गट त्यांना टरबूज्या म्हणायचा. सध्या तेच नाव सर्वश्रुत झालं आहे. या गोष्टीला विरोधी पक्ष करणार तरी काय ? असा टोला अनिल गोटेंनी यांनी पत्रकातून लगावला आहे. 

भाजपमध्ये विशेष म्हणजे नाव आणि अडनाव एकत्र करून छोटं नाव वापरण्याची पध्दत आहे. नरेंद्र मोंदीना 'नमो' म्हणतात, तर अमित शहांना 'मोटाभाई' म्हणतात तसेच चंद्रकांत पाटलांना 'चंपा' म्हणत असावेत असाही टोला त्यांनी लगावला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News