भाजप, कॉंंग्रेसची सोशल मीडियावर खिल्ली; पाहा हास्यास्पद मिम्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 February 2020

सोशल मीडियावर सध्या #DelhiElectionResult हा ट्रेंड सुरु आहे. तरुणाईने विविध प्रकारचे मीम्स शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे संपुर्ण देशाच लक्ष लागले होते. मतमोजणी सुरु असून निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. पहिल्या फेरीत आम आदमी पार्टी आघाडीवर होती. 'आप'ला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे तर कॉंग्रेस आणि इतर पक्षांना खातेही उघडता आले नाही. माध्यमांमध्ये दिल्ली निवडणुकीचे विश्लेषण सुरु आहे तर सोशल मीडियावर भाजप आणि कॉंग्रेसची खिल्ली उडवरे मिम्स व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर सध्या #DelhiElectionResult हा ट्रेंड सुरु आहे. तरुणाईने विविध प्रकारचे मीम्स शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही वेळातच संपुर्ण निवडणुकीचा निकाल जाहीर होईल मात्र, तरुणाईने शेअर केलेल्या मिम्स पाहून नक्कीच हसू येईल. दिल्लीत अनेक वर्षे कॉंग्रेसची सत्ता होती मात्र, यंदा कॉंग्रेसला खाते उघडता आले नाही, त्यामुळे लोकांनी कॉंग्रेसवर मजेदार मीम्स शेअर केले आहेत.

दिल्लीच्या 70 विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक झाली. एकुण 672 उमेदवार उभा टाकले होते. भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी दोन्ही पक्षात थेट निवडणूक होणार हे चित्र निवकालापुर्वीत सिद्ध
झाल होत. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस धुळसपाट झाली आहे. त्यामुळे कॉग्रेसचा उमेदवार कुठे दिसतो का? हे पाहण्यासाठी दुर्बीनचा वापर केला आहे.

 

तरुण म्हणतोय... स्वत:च्या हाताने घातली इज्जत

 

तुम्ही कोणासोबत आहात, आप सोबत

 

इव्हीएमला उद्देशून, कोणाला जिंकवायसाठी आलो होते कोण जिंकल?

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News