बिबट्याचा तरूणावरती बचावात्मक हल्ला

महेश घोलप
Saturday, 26 September 2020

ग्रामीण भागातच मनुष्य आणि प्राणी यांच्यातला संघर्ष अद्याप संपलेला नाही. कारण लोकांनी जंगलात घरं बांधायला सुरूवात केली आहे. उन्ह्याळ्याच्या दिवसात अनेकदा प्राणी पाण्यासाठी भटकंती करीत असतात, भटकंतीत कधी गाव येत हे प्राण्यालाही समजत नाही.

लोकांना निसर्ग हवाहवासा वाटतो, कारण निसर्गातली प्रसन्नता इतर कुठेही तुम्हाला मिळत नाहीत. अनेक तरूण आणि एनजीओ काम करणारे तरूण ते जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना आजही अडचणीचा सामना करावा लागत आहे. जंगल राहिलं तर तुमचा निसर्ग टिकेलं, तसंच तुम्हाला तुमचे आवडते प्राणी टिकतील. ब-याचदा प्राण्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याने मानव चिडत असतो. कारण मानवाला त्यांच्याकडून कायतरी फायदा असतो. अनेक जंगलातल्या प्राण्यांना खाण्यातून विषारी औषधं देण्यात येतं, त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. तर काहीवेळेला धाडसी तरूण रागाच्या भरात बंदुकीतून गोळ्या घालतात अशी अनेक प्रकरण आपण देशभरात पाहिलेली आहेत. कोरोनाच्या गावाकडं आलेल्या तरूणावरती बिबट्याने बचावात्मक हल्ला केला आणि बिबट्याचं वास्तव असल्याचं सगळ्यांना माहित झालं.
 
मार्च महिन्यात सांगली जिल्ह्यातल्या चरण या गावी अनेक तरूण शहरातून परतले. कारण शहरातली नोकरी संपुष्टात आल्याचं त्यावेळी मालकाने सांगितलं होतं. त्यामुळे अनेक तरूणांनी आपलं लक्ष शेतीकडं वळवलं. त्यावेळी शेतात उसाचं पीक गुडघ्यापर्यंत आलं होतं. तसंच भाताचं पीक घेण्यासाठी रान मोकळी होती. त्यावेळी परिसरात फिरणा-या तरूणांना अनेकदा शेतात बिबट्याची विष्ठा आढळली होती. त्यामुळे तिथं असं काहीतरी असणार एवढं नक्की झालं होतं.
 
घरात दुधाची जनावरं असल्यामुळे तरूण सकाळी चारा आणायला शेतात जायचे. कारण दुधातून मिळणा-या पैशांवर घरं चालणार होतं. ग्रामीण भागात व्यवसाय करण्यासारखं काही नाही., त्यात पुन्हा नोकरी मिळले न मिळेल, तसेच कोरोनाचा निश्चित काळ माहित नसल्याने त्यांनी जनावर एवढंचं डोक्यात ठेवलं. तसेच जिथं विष्ठा आढळली होती. तिथं जनावरांचे गोठे सुध्दा होते. त्यामुळे तरूणांनी बिबट्याचा शोध घ्यायचा ठरवला. शेजारी एक ओढा असल्याने तिथं त्याचं वास्तव असण्याची शक्यता अनेकांना वाटतं होती. रोज सकाळी बिबट्याचे रात्रभर फिरलेले पाय दिसायचे. त्यामुळे परिसराता एकटं माणूस जायला घाबरत होतं. कारण वाघाच्या तावडीत सापडलं तर काही खरं नाही असं त्यांना वाटतं होतं.
 
एके दिवशी सकाळी उसात पाचट काढत असताना, अमोल चोरमारे या तरूणाला बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले. तो तेवढ्यावर थांबला नाही, त्याने उसात पुढं जाऊन शोध घ्यायला सुरूवात केली. त्यादरम्यान त्याला दोन बिबट्याची पिल्ली दिसली. त्यांचा आवाज येत होतो. त्याने बिबट्याची पिल्ली असलेलं सगळं शेत पालतं घातलं परंतु त्याला कुठेही बिबट्या दिसला नाही. कदाचित बिबट्याने आपलं वास्तव बदललं असावं असं त्याला लक्षात आलं. त्यानंतर अमोलने हे प्रकरण गावातल्या तरूणांना सांगितलं. त्याने शेजारी शेत असलेल्या लोकांना सांगितलं कारण बेसावध असताना त्यांच्यावरती हल्ला होईल.
 
रात्री आभाळ जोरात घडघडत होतं. त्यात पाऊस केव्हाही येईल अशी शक्यता असल्याने काही तरूण तिथं जनावरं पाहायला गेली होती. त्यावेळी झाडावरून आणि मोकळ्या शेतातून बिबट्या फिरत असल्याचे काही तरूणांनी पाहिलं कारण ज्यावेळी वीज होत होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रकाश पडत होता. त्यावेळी हा सगळा प्रकार तरूणांना पाहायला मिळाला. बिबट्याला इथून कसा हटवायचा यांचा प्रयत्न तरूण करू लागले. अनेकांनी फॉरेस्ट खात्याला कळवण्याचा निर्णय घेतला. तसं कळवलं सुध्दा पण पिल्ली जर का असतील तर तो बिबट्या १०० किलोमीटरवरून परत येतो असं सांगितलं.
 
साधारण एका आठवड्याचा कालावधी झाला असेल, सकाळी एक महिला चारा आणण्यासाठी शेतात गेली होती. त्यावेळी तिला बिबट्याने दर्शन दिलं. बिबट्याने त्या महिलेला पाहिल्यानंतर त्याने महिलेचा पाठलाग केला. माणूस आणि प्राणी यामधला संघर्ष सुरू झाला. ही बातमी गावभर पसरली. तिथं असलेल्या एका शेतक-याने त्याच दिवशी पुन्हा बिबट्याला पाहिलं. सकाळची वेळ असल्याने बिबट्याला तिथून पळवून लावायच्या हिशोबाने सगळ्यांनी तिथला परिसर पिंजून काढायला सुरूवात केली. साधारण १५ जण असतील कारण तिथं गेल्यानंतर अनेकांनी हातात काठ्या घेतल्या होत्या. ज्या शेतात बिबट्या असल्याचा संशय होता. त्या उसाच्या सरीत तीघे तरूण घुसले. बाकीचे तरूण इतर शेतात बिबटयाचा शोध घेत होते. सगळे आज बिबट्याला इथून दुसरीकडे पाठवायच्या हिशोबाने शोध घेत होते. अनेकांनी स्वत: च्या बचावासाठी काठ्या हातात घेतल्या होत्या. सगळं वातावरण शांत असताना अचानक बिबट्याने जोरात डरकाळी फोडली. डरकाळी इतक्या जोरात होती की संपुर्ण परिसर हादरून गेला. समोर असलेल्या तरूणांच्या अंगावर झेप घेतली आणि त्याच्या हाताला जोरात चावा घेतला. भयभीत झालेला बिबट्या दुस-या शेतात पळाला.
 
ज्याच्या अंगावर बिबट्याने हल्ला केला, त्याचं गणेश शिंगमोडे त्याने हल्ला केलेला हात तसाचं पकडला. सोबत असलेल्या मुलांनी त्याला गावातल्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. बिबट्याने हाताचा पंजा पडल्याने हातातून अधिक रक्तस्त्राव झाला. गावातल्या दवाखान्यात लस नसल्याने गणेशला जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. लस दिल्यानंतर त्याला परत पाठवले. त्यानंतर ही बातमी प्राणी वन्यजीवसाठी काम करणा-या प्रणव महाजन यांच्या कानावर गेली आणि त्यांनी गावाला समजून सांगण्याचं ठरवलं.
 
कोरोनाच्या काळात बैठक घेता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सुरूवातीला गावच्या सरपंचांची भेट घेतली. त्यानंतर हल्ला झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. पाहणी करत असताना सुरूवातीला बिबट्याचे ठसे पाहिले. त्यावर त्यांनी महाजन यांनी सांगितलं की हे ठसे १० वर्षाच्या बिबट्याचे आहेत. सगळा परिसर पिंजून काढला परंतु तिथं वाघाचं दर्शन झालं नाही. त्यावेळी प्रणव महाजन म्हणाला की आत्तापर्यंत वाघाने आपल्याला असंख्यवेळा पाहिलं असेल, पण आपण त्याला पाहू शकत नाही. बिबट्याचं भक्षक हे पाळीव प्राणी आहेत, त्यामुळे तो मनुष्यावरती हल्ला करत नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. जर बिबट्याची इथं पिल्ली असली आणि त्याला इथं पकडलं तर तो १०० किलोमीटरहून परत त्या ठिकाणी येतो. बिबट्यासोबत त्याची सगळी पिल्ली सापडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एकदा का बिबट्याला एखादं ठिकाणं आवडलं तर तो तिथून त्याचं वास्तव हलवतं नाही. त्यामुळे त्याला सोबत घेऊन तुम्हाला जगावं लागेल. जर का बिबट्या एकटा असेल तर तो इथं आता थांबणार नाही.
 
वरती सांगितलेली सगळी माहिती महाजन यांनी शेती असलेल्या लोकांना सांगितली. त्यानंतर महाजन यांनी आपलं महाराष्ट्रातली उदाहरण द्यायला सुरूवात केली. बिबट्याचं आवडतं खाद्य म्हणजे पाळीव कुत्रा, तो त्याच्यासाठी घराच्याबाहेर फिरतो. एका प्राणी अभ्यासकानं असं म्हटलं आहे की बिबट्याचा वावर हा रात्रीचा असतो. त्यांच्या भक्ष्यक शोधण्याचं काम हे रात्रीचं करतो. त्यामुळे तो तुमच्या घराभोवती अनेकदा फिरून गेलेला असतो. तसंच तुमच्या घरात किती लोकं असतात इथपर्यंत त्याला माहित असतं असं त्यांनी सांगितल्याचं प्रणव महाजन यांनी सांगितलं.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News