ऑस्कर वर विजयी पताका फडकावणारा ए आर रहमान याचा आज वाढदिवस

स्वप्नील नावडकर
Monday, 6 January 2020

आपला सर्वांचा लाडका ए आर रेहमान आज वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी पदार्पण करतोय. ए आर रेहमान यांनी आजपर्यंत अनेक पुरस्काराना गवसणी घातली. ए आर रेहमान यांच नाव भारतीय चित्रपट सृष्टीत अगदी आदराने घेतल जात.
गेल्या ९ दशकांपासून ऑस्करसाठी भारतीय वंचित होते पण हा बहुमान मिळवला  तो म्हणजे ए आर रहमान यांनी.  

मुंबई : संपूर्ण जगातील चित्रपटसृष्टीत अत्यंत महत्वाचा समजला जाणारा तसेच सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असा पुरस्कार म्हणजे  ऑस्कर पुरस्कार ...

ह्याच ऑस्कर पुरस्कारावर स्वतःच नाव कोरण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो.पण अजून भारतीय सिनेसृष्टीतील अनेक कलाकार ऑस्कर पासून  वंचित आहेत. अनेक जण तर ऑस्कर च्या नामांकनामध्ये नाव आले म्हणून धन्यता समजतात. ऑस्कर वर  भारतीय तिरंगा फडकावणारा एकमेव संगीतकार म्हणजे ए आर रेहमान... 

याच ए आर रेहमान चा आज वाढदिवस... आपला सर्वांचा लाडका ए आर रेहमान आज वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी पदार्पण करतोय. ए आर रेहमान यांनी आजपर्यंत अनेक पुरस्काराना गवसणी घातली. ए आर रेहमान यांच नाव भारतीय चित्रपट सृष्टीत अगदी आदराने घेतल जात.
गेल्या ९ दशकांपासून ऑस्करसाठी भारतीय वंचित होते पण हा बहुमान मिळवला  तो म्हणजे ए आर रहमान यांनी.  

ए आर रेहमान यांना  २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्यासाठी  सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला तसेच बेस्ट बॅकग्राउंड म्युसिक चा बहुमान देखील त्यांनाच मिळाला. 

बर्थडे  बॉय ए आर रेहमान याना मिळालेल्या ऑस्कर पुरस्कारामुळे  भारतीयांची मान मात्र अभिमानाने उंचावली हे मात्र  नक्की.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News