बिपाशा बासू करतॆ बॅलेन्स डाएट आणि कठोर व्यायाम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 10 September 2019

गोड पदार्थांची खूप चाहती असल्यामुळे रात्री मी डेझर्टमध्ये काहीतरी थोडेसे गोड पदार्थ खाते.

‘बॅलेन्स डाएट आणि कठोर व्यायाम’ हेच माझ्या निरोगी आणि तंदुरुस्त शरीराचे सिक्रेट आहे. या दोन्ही गोष्टी मी कटाक्षाने पाळते. माझे डाएट फारच स्ट्रिक्ट असते. सकाळी उठल्यानंतर लिंबाचा रस घातलेले पाणी पिते, त्यासोबत रात्रभर भिजवलेले बदाम खाते आणि त्यानंतर चहा पिते. त्यानंतरच्या नाश्‍त्यामध्ये सहा अंड्यांचा पांढरा भाग, टोस्ट, मशरूम, लापशी आणि काही प्रमाणात फळे खाते.

दुपारच्या जेवणात मी बंगाली असूनही भात खात नाही. त्यामुळे माझे दुपारचे जेवण हे खूप साधे असते. यामध्ये डाळ, ग्रीन सलाड, भाजी, भाजलेले मासे किंवा चिकन आणि दोन चपात्या खाते. रात्रीच्या जेवणात मी ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवलेल्या भाज्या, ग्रीन सलाड, भाजलेले मासे किंवा चिकन खाते. मी गोड पदार्थांची खूप चाहती असल्यामुळे रात्री मी डेझर्टमध्ये काहीतरी थोडेसे गोड पदार्थ खाते.

मला व्यायाम वगैरे गोष्टी फार आवडत नव्हत्या. त्यामुळे मॉडेलिंगच्या काळात या गोष्टींपासून मी दूरच राहत होते. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर मी माझ्या शरीराकडे बारकाईने लक्ष द्यायला लागले. यामध्ये मी कार्डिओसारख्या एक्सरसाइजला जेवढे महत्त्व देते, तेवढेच महत्त्व योगासने करण्याला देखील देते. मला योगासने खूप आवडतात व त्यामुळे मी दिवसाला १०८ सूर्यनमस्कार घालते. मी दररोज दोन तास व्यायाम करते. यामध्ये कार्डिओ आणि योगा यांवरच अधिक भर असतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News