रेवदंडा येथे बाईकर्स फेस्टीव्हल

YIN BUZZ TEAM
Thursday, 24 January 2019

केवळ राज्यभरातूनच नव्हे तर देशाच्या अन्य भागातूनही जवळपास 200 हून अधिक बाईकर्स यात सहभागी झाले होते. यात महिला बाईकर्सची संख्याही अधिक होती. जुन्या नव्या बाईकर्सनी यावेळी आपले विचार मांडले. यानिमित्ताने स्लो बायकिंग, फायरिंग यांच्या छोटेखानी स्पर्धाही आयोजीत करण्यात आल्या होत्या.  यात महिलांनीही सहभाग घेतला. बाईकींग करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबतही अनुभवींनी मार्गदर्शन केले.

अलिबाग : सध्या तरुणाईमध्ये बाईकींगचे वेड वाढत आहे. डोक्यावर हेल्मेट आणि त्यावर छोटा कॅमेरा लावून फिरणारे बाईकर्स ठिकठिकाणी पहायला मिळतात. या सर्व बाईकर्सना एकत्र आणून विचारमंथन व्हावे, त्याचा प्रचार प्रसार व्हावा, या हेतूने अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्रकिनारी बाईकर्स फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते.

केवळ राज्यभरातूनच नव्हे तर देशाच्या अन्य भागातूनही जवळपास 200 हून अधिक बाईकर्स यात सहभागी झाले होते. यात महिला बाईकर्सची संख्याही अधिक होती. जुन्या नव्या बाईकर्सनी यावेळी आपले विचार मांडले. यानिमित्ताने स्लो बायकिंग, फायरिंग यांच्या छोटेखानी स्पर्धाही आयोजीत करण्यात आल्या होत्या.  यात महिलांनीही सहभाग घेतला. बाईकींग करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबतही अनुभवींनी मार्गदर्शन केले. या निमित्ताने कोकणातील निसर्ग सौंदर्य, येथील खाद्यसंस्कृती याची ओळख होण्याबरोबरच इथं पर्यटन वृद्धीसाठी आमचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. येथे येवून खूप काही शिकायला मिळाल्याचे नवोदीत बाईकर्सनी सांगितले .

‘बाईकींग करणार्‍यांची संख्या वाढली आहे. अशा प्रकारच्या फेस्टीव्हलमधून कोकणात पर्यटन वाढवण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात  येणार्‍या नवीन पिढीला यातून मार्गदर्शन मिळत असते.  हे आमचे तिसरे वर्ष आहे. दरवर्षी या फेस्टीव्हलला येणार्‍यांची संख्या वाढते आहे.’  
आकाश राणे , आयोजक

बाईकींग हे केवळ साहस नाही तर हा छंद आहे. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. आम्ही बाईकर्स कुटुंबासारखे राहतो आणि असे कार्यक्रम म्हणजे कुटुंबाचं एक संमेलन असते. येथे सर्वजण येतात आपले विचार मांडतात . विचारांची शिदोरी घेवून सारे परत जातात.
डॉ. राकेश चौधरी , सहभागी बाईकर
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News