मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक फ्रॉड : काँग्रेस 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020

मोदी सरकारच्या काळात निरव मोदीसारखे हिरेव्यापारी, विजय मल्ल्यासारखे उद्योगपती या सर्वांनी मोठा फ्रॉड करून देशाबाहेर पलायन केले आहे. यामुळे सरकारवरला आर्थिक नुकसान होतच आहे.

मुंबई : केंद्रात मोदी सरकार असल्याचा तोटा आपल्या सर्वांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या काळात निरव मोदीसारखे हिरेव्यापारी, विजय मल्ल्यासारखे उद्योगपती या सर्वांनी मोठा फ्रॉड करून देशाबाहेर पलायन केले आहे. यामुळे सरकारवरला आर्थिक नुकसान होतच आहे, त्याचबरोबर आपल्यालाही फसवले गेले आहे. तसेच मागच्या तीन वर्षात फ्रॉडची संख्या कमालीची वाढलेली आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काँग्रेसने हा आरोप केला आहे. 

पोस्ट मध्ये आहे - 
पंतप्रधान मोदींच्या काळात बँकांमधील 'फ्रॉड'ची संख्या वाढली
खातेदारांची होतेय कोट्यवधी रुपयांची फसवणूक

मोदी सरकारच्या काळात बँकांमधील घोटाळे, बनावट कर्ज, डेटा चोरी, हॅकिंग, सायबर हल्ले यांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीयरित्या वाढत आहे. कोट्यवधींचे कर्ज बुडवून आणि घोटाळे करून अनेक मोठमोठे उद्योजक मोदी सरकारच्या हातावर तुरी देऊन फरार झाले. तरीही घोटाळे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मागील तीन वर्षात बँकांमधील 'फ्रॉड'ची संख्या झपाट्याने वाढल्याचे रिझर्व्ह बँकेची आकडेवारी सांगते. चालू आर्थिक वर्षात बँका आणि वित्त संस्थांमध्ये १ लाख १३ हजार ३७४ कोटींचे घोटाळे झाले तर २०१६-१७ या वर्षात बँकांमधून ४१ हजार १६७ कोटींचे घोटाळे समोर आले होते. खातेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असतानाही केंद्र सरकारला जाग येत नाही हे निश्चितच चिंताजनक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News