स्टेट बँकेत ‘या’ पदांसाठी मोठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 July 2020

२३ जूनपासून ही प्रक्रिया सुरू असून १७ जुलै ही अर्ज करण्याची अखेरची तारिख आहे. अधिक माहितीसाठी https://sbi.co.in/web/careers/current-openings या संकेस्थळाला भेट द्या.

स्टेट बँकेत ‘या’ पदांसाठी मोठी भरती

कोरोनाच्या काळात अनेकांना नोकरी सोडावी लागली आहे, तसेच भविष्यात आपल्याला कधी नोकरी लागले आणि आपलं पहिल्यासारखं सगळं कसं सुरळीत होईल या चिंतेत असलेल्या तरूणांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत अनेक पदं लवकरच भरली जाणार आहेत. 

विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात ही भरती निघाल्याने अनेकांना त्याचा फायदा होणार आहे. अखेरचे काही दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे आजचं अर्ज करा. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या जागा भरण्यात येणार आहेत. 

ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, इंजिनिअर, एमबीए, पीजीडीएम किवा चार्टर्ड अकाऊंटंट ही पदवी ज्या तरूणाकडे आहे, त्या तरूणांनी आजच स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अधिकृत संकेतस्थळावर अर्जाची संपुर्ण माहिती दिली आहे. 

पदांची संख्या – 119

एसएमई क्रेडिट अॅनालिस्ट – 20 पदं, प्रोडक्ट मॅनेजर – 6 पदं, मॅनेजर (डाटा अॅनालिस्ट) – 2 पद, मॅनेजर (डिजिटल मार्केटिंग) – 1 पद, फॅकल्टी, एसबीआयएल, कोलकाता – 3 पदं, सिनिअर एक्झिक्यूटिव्ह (डिजिटल रिलेशन्स) – 2 पदं, सिनिअर एक्झिक्यूटिव्ह (अॅनालिटिक्स) – 2 पदं, सिनिअर एक्झिक्यूटिव्ह (डिजिटल मार्केटिंग) – 2 पदं, बँकिंग सुपरवायजरी स्पेशलिस्ट – 1 पद, मॅनेजर (एनिटाईम चॅनल) – 1 पद, डिप्टी मॅनेजर (आयएस ऑडिट) – 8 पदं, वाइस प्रेसिडेंट (स्ट्रेस्ड असेट्स मार्केटिंग) – 1 पद, मॅनेजर (स्पेशल सिच्युएशन टीम) – 3 पदं, डिप्टी मॅनेजर (स्ट्रेस्ड असेट्स मार्केटिंग) – 3 पदं, हेड (प्रोडक्स, इनव्हेस्टमेंट अँड रिसर्च) – 1 पद, सेंट्रल रिसर्च टीम (पोर्टफोलियो अॅनालिसिस अँड डाटा अॅनालिटिक्स) – 1 पद
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – 1 पद, इनव्हेस्टमेंट ऑफिसर – 9 पदं, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी) – 1 पद, रिलेशनशिप मॅनेजर – 48 पदं, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) – 3 पदं

२३ जूनपासून ही प्रक्रिया सुरू असून १७ जुलै ही अर्ज करण्याची अखेरची तारिख आहे. अधिक माहितीसाठी https://sbi.co.in/web/careers/current-openings या संकेस्थळाला भेट द्या.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News