आयफोनवर बिग ऑफर; 13 हजारपर्यंत मिळणार डिस्काउंट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020
  • सर्वसामान्य ग्राहकांसाठी ऑपलने कंपनीने मोठी ऑफर जाहीर केली आहे.

आयफोन हा सर्वांना हवाहवासा वाटणारा स्मार्टफोन आहे. मात्र आयफोनच्या प्रचंड किंमतीमुळे सर्व सामान्य ग्राहकांना विकत घेणे शक्य नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी ऑपलने कंपनीने मोठी ऑफर जाहीर केली आहे. एका स्मार्टफोसमागे 5 ते 10 हजार रुपयापर्यंत सुट दिली आहे. ही ऑफर  ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

'या' फोनवर 13 हजार 450 रुपयांचा एक्सचेंज ऑफर

एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आलेला आयफोन ES 64 जीबी स्मार्टफोनची किंमत 42 हजार 500 रुपये होती, आता 35 हजार 999 रुपयाला  ES 64 मिळणार आहे. 128 जीबी 47 हजार 800 रुपये किंमतीचा फोन 40 हजार 999 रुपयाला मिळणार आहे तर 256 जीबीचा स्मार्टफोन 58 हजार 300 रुपयाला होता आता 55 हजार 999 रुपयाला उपलब्ध आहे. ही ऑफर लिमिटेड कालावधीसाठी मिळणार आहे. त्याचबरोबर आयफोन एक्सआर 64 जीबी मॉडेलचा स्मार्टफोन 45 हजार 999 रुपयांमध्ये मिळणार आहे त्याची किंमत 51 हजार 999 रुपये होती या फोनवर 13 हजार 450 रुपयांचा एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे.

तक्काळ 5 हजार कॅश बॅग

आयफोन 11 वर तब्बल पाच हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला. 64 जीबी मॉडेल 63 हजार तीनशे रुपये आणि 128 जीबी 68 हजार 600 रुपये किमतीला उपलब्ध आहे. यावर एचडीएफसी क्रेडीट कार्ड ग्राहकांना पाच हजार रुपये सवलत मिळणार आहे त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्याव घ्यावा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News