मोठी बातमी:सारथीबाबत संभाजीराजेंची मागणी मान्य; प्रधान सचिव गुप्तांचीही करणार हकालपट्टी

सकाळ (यिनबझ)
Saturday, 11 January 2020
  • संभाजीराजेंची मागणी मान्य

  • सारथीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

  • प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांना पदावरून हटवणार

पुणे:  मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले पुण्यातील सारथी संस्थेच्या बाहेर पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाचं हत्यार  उपसताच सरकार खडबडून जागे झाले. सरकारनं याचीच दखल घेत सारथीबाबत संभाजीराजेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. 

ओबीसी विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांची सरकारनं हकालपट्टी करणार असुन यावर सरकार या प्रकरणात गांभीर्यांनं लक्ष देत चौकशी करणार असल्याचं आश्वासन कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंना दिले. तसेच मराठा आरक्षणासाठी देखील पुर्ण ताकदीनं आम्ही न्यायालयात लढणार असल्याचं ते म्हणाले.

संभाजीराजे यांनी जवळपास 22 वेळा पत्रकं देउनंही मुख्य सचिव असलेल्या जे.पी. गुप्ता यांनी याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही, तसेच 'सारथी'ला मुद्दामुन बदनाम करत असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, सा यारथी या संस्थेसाठी मी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली. पाठपुरावा करूणही काही झालं नाही म्हणुनच मी आंदोलनाचं हत्यार उपसलं असल्याचं ते म्हणाले .

संभाजीराजे भोसले यांनी आयुष्यात पहिल्यांदाच लाक्षणिक उपोषण केलं होतं. 'सारथी बचाव' अशी हाक देत मराठा तरूणांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिबां दर्शवला होता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News