यंदा ITI प्रवेश प्रक्रीयेत मोठा बदल; जाणून घ्या! सुधारित नियम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 July 2020

पुर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांना आयटीआयत प्रवेश मिळावा, पारदर्शक प्रवेश प्रक्रीया व्हावी, राज्यातील सरकारी आणि खासजी संस्थेतील जागांची ऑनलाईन माहिती मिळावी याकरीता प्रवेश प्रक्रीयेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून सुधारित नियम लागू  होणार आहेत.

मुंबई : औद्योगीक क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध आहे. संधीचं सोन करण्यासाठी तंत्रशिक्षण घेणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कल औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत (ITI) शिक्षण घेण्याकडे आहे. पुर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांना आयटीआयत प्रवेश मिळावा, पारदर्शक प्रवेश प्रक्रीया व्हावी, राज्यातील सरकारी आणि खासजी संस्थेतील जागांची ऑनलाईन माहिती मिळावी याकरीता प्रवेश प्रक्रीयेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून सुधारित नियम लागू  होणार आहेत.

प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी डॉ. अनिल जाधव यांच्या नेत्रुत्वाखाली एक समिती गठीत करण्यात आली. प्रवेश प्रक्रीया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी समितीने सखोल अभ्यास केला. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला आपला अहवाल सादर केला. संचालनालयाने यावर सविस्तर चर्चा करुन अहवाल स्वीकरला आणि शिक्षणतज्ज्ञाचे यावर मत जाणून घेतले. त्यानंतर सुधारीत नियमावली तयार करण्यात आली. यंदापासून सुधारीत राबवली जाणार आहे. 

कशी होणार प्रवेश प्रक्रीया?

दरवर्षी ३० टक्के जागा राज्यस्तरावरुन आणि ७० टक्के जागा तालुकास्तरावरुन भरल्या जातात. मात्र सुधारीत नियमानुसार ७० टक्के जिल्हास्तरावरुन आणि ३० टक्के राज्यस्तरारुन जागा भरल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जिल्हा आणि राज्यस्तरावरुन तयार केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यात प्रवेश घ्यायचा असल्यास, जिल्ह्यातील सर्व आयटीआयची नावे, वस्तीगृहीची सोय, दळनवळनाची अद्यावत माहिती संकेतस्थळावर दिली जाणार आहे. प्रवेश प्रक्रीयाविषयी सर्व डाटा विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सुरुवातीला प्रवेश प्रक्रियेच्या जनरल चार फेऱ्या होणार आहेत, त्यानंतर विद्यार्थ्यांना समुपदेशन करुन अडचणी सोडवल्या जाणार आहेत.  

संस्थेला 'हे' नियम बंधनकारक

खासगी आणि अल्पसंख्यांक औद्योगीक प्रशिक्षण संस्थांना व्यवस्थापन आणि जनरल जागांचा तपशील संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर संपुर्ण प्रशिक्षण कालावधीसाठी निश्चित केलेली फी संकेतस्थळावर जाहीर करावी. सर्व जागा ऑनलाईन भराण्यात याव्यात. तसेच व्यवस्थापन कोट्यातून झालेले प्रेवश संकेतस्थळावर अपलोड करावे. सर्व माहिती विद्यार्थ्यांना मोबाईलवरुन पुरवण्याची सोय संस्थांनी कारावी. प्रवेशाबाबत समस्या सोडवण्यासाठी आणि समुपदेशनासाठी हेल्प लाईन नंबर नावासह प्रसिध्द करावा. तसेच जिल्हास्तरावर कोणते रोजगार उपलब्ध होणार आहेत यांची माहीत विद्यार्थ्यांना द्यावी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News