#bigboss13 : TRP मध्ये नंबर वन म्हणून दोन आठवडे वाढवणार शो

यिनबझ टीम
Thursday, 16 January 2020

बिग बॉस 13 ची लोकप्रियता आणि टीआरपी प्रत्येक दिवसाबरोबर वाढतच आहे. ऑनलाईन टीआरपीमध्ये बिग बॉसने सगळे रेकॉर्ड्स तोडले आहेत. सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या 10 कार्यक्रमांच्या टॉपवर सध्या बिग बॉस शो आहे.

बिग बॉस 13 च्या या धडाकेबाज सीझनमध्ये बरेच ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचे यश पाहून बिग बॉसच्या निर्मात्यांनी या हंगामात 5 आठवड्यांचा कालावधी वाढविला होता. 

आता बिग बॉस फॅन क्लबवर दावा केला जात आहे की या शोचे भाग वाढविले जाणार आहेत. या शोच्या यशानंतर अशी गोष्ट समोर येत आहे की हा शो दुसऱ्यांदा दोन आठवड्यांसाठी एक्स्टेंड केला जाणार आहे.

पहिल्या आठवड्यांच्या मुदतीनंतर बिग बॉसची अंतिम फेरी 15-16 फेब्रुवारीला होणार होती, पण २ आठवड्यांच्या वाढीनंतर हा कार्यक्रम 28 फेब्रुवारीपर्यंत प्रेक्षकांना पाहायला  मिळणार आहे. 

तथापि, बिग बॉस निर्मात्यांनी आणि चॅनेलद्वारे पुन्हा या कार्यक्रमाची मुदत वाढवण्यासाठी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण अशी बातमी आहेत की हा शो 2 आठवडे वाढवण्याच्या मागणीला घेऊन निर्माते सलमान खानला राजी करण्यात व्यस्त आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News