बिग बींकडून कौतुकाची थाप

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 February 2019

अभिनेते सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ चित्रपट सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतोय. अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय ती या चित्रपटाची.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा जवळचा मित्र म्हणजेच सचिन पिळगावकर यांना या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘माझा मित्र, सहकलाकार सचिन पिळगावकर यांनी तयार केलेल्या उत्तम कलाकृतीसाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा.’ असे बिग बी यांनी ट्विट करत ‘अशी ही आशिकी’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ नेहमीच नवनव्या टॅलेन्टच कौतुक करत असतात. त्यांनी सचिन यांच्या या चित्रपटाचंही कौतुक करत या चित्रपटातील कलाकारांचं प्रोत्साहन वाढवलं आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News