बिएल बुद्धिबळ महोत्सवात पी. हरिकृष्णने पटकावले विजेतेपद 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020

ग्रॅंडमास्टर पी. हरिकृष्णने बिएल बुद्धिबळ महोत्सवातील ऍकेंटस चेस 960 स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याने सात फेऱ्यांचा या स्पर्धेत साडेपाच गुणांची घवघवीत कमाई केली.

मुंबई:  ग्रॅंडमास्टर पी. हरिकृष्णने बिएल बुद्धिबळ महोत्सवातील ऍकेंटस चेस 960 स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याने सात फेऱ्यांचा या स्पर्धेत साडेपाच गुणांची घवघवीत कमाई केली.
हरीने या स्पर्धेत एकही लढत गमावली नाही. पोलंडचा रादोस्लॉ वॉजतॅसझेक हा अखेरच्या फेरीत पराजित झाल्यामुळे हरीचे विजेतेपद निश्‍चित झाले. फिशर रॅंडम स्पर्धा असेही संबोधले जात असलेल्या या स्पर्धेत पंधरावर्षीय व्हिन्सेंट केमर याने दुसरा क्रमांक मिळवला. त्याचे साडेचार गुण झाले.

ही स्पर्धा ऑनलाईन होत नसून स्पर्धक एकमेकांसमोर बसून खेळत आहेत. स्पर्धेच्या संकेतस्थळानुसार स्पर्धा घेताना सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन होत आहे. दोन लढतीत सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी किमान दोन टेबलचे अंतर ठेवले आहे. त्याचबरोबर प्रत्येक लढतीनंतर बुद्धिबळाचा पट, मोहरे तसेच घड्याळाचे निर्जंतुकीकरण होत आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आलेला नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News