बीड पॅटर्न: अव्वल येण्याची परंपरा कायम

दत्ता देशमुख
Sunday, 9 June 2019
 • जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८१.२३ टक्के 
 • निकालात मुलींची बाजी
 • पाटोदा तालुक्याचा सर्वाधिक तर धारुर तालुक्याचा सर्वात कमी निकाल
 • उत्तीर्णांत मुलींचे प्रमाण ८७.०९ टक्के तर मुलांचे ७६.८८ टक्के

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या शनिवारी लागलेल्या निकालात जिल्ह्याने औरंगाबाद विभागात बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याचा सर्वाधिक ८१.२३ टक्के एवढा निकाल लागला आहे. विशेष म्हणजे निकालात विभागात प्रथम येण्याचे जिल्ह्याचे हे पाचवे वर्षे आहे.

असे असले तरी यंदा निकालाचा टक्का घसरल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात यंदा २४ हजार ६६३ मुले आणि १८ हजार २९७ मुली अशा ४२ हजार ९६० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यातील १८ हजार ९६२ मुले आणि १५ हजार ९३४ मुली असे ३४ हजार ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.०९ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७६.८८ टक्के आहे. जिल्ह्यात पाटोदा तालुक्याचा सर्वाधिक ८७.२९ टक्के एवढा निकाल लागला आहे.

यंदा 1 ते २२ मार्च या कालावधीत दहावीच्या परीक्षा पार पडल्या. जिल्ह्यात या परीक्षेसाठी ४३ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केले होते. त्यापैकी ४२ हजार ९६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेच्या शनिवारी लागलेल्या निकालात बीड जिल्ह्याने औरंगाबाद विभागात मागील पाच वर्षापासून प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली आहे. विभागाचा एकुण निकाल ७५.२० टक्के इतका लागला आहे. यात बीड जिल्ह्याचा सर्वाधिक ८१.२३ टक्के निकाल लागला आहे. त्याखालोखाल औरंगाबाद (७७.२९), जालना (७६.१४), परभणी (६६.३५) आणि हिंगोली जिल्ह्याचा सर्वात कमी (६४.५३) टक्के निकाल लागला आहे.

आकडे बोलतात

 • परीक्षेसाठी मुलांचे अर्ज : २५२००
 • परीक्षेसाठी मुलींचे अर्ज : १८६१६
 • परीक्षा दिलेले मुले : २४६६३
 • परीक्षा दिलेल्या मुली : १८२९७
 • एकूण परीक्षा दिलेले विद्यार्थी : ४२९६०
 • उत्तीर्ण मुले : १८९६२
 • उत्तीर्ण मुली : १५९३४
 • एकूण उत्तीर्ण : ३४८९६

तालुका निहाय निकाल (टक्क्यांत)

 • पाटोदा : ८७. २९
 • शिरुर कासार : ८६.४०
 • बीड : ८६.२४
 • आष्टी : ८३.४२ 
 • गेवराई : ८०.१५
 • माजलगाव : ७३.३२
 • अंबाजोगाई : ७८.०६ 
 • केज : ८१.२७
 • परळी : ७६.३४ 
 • धारुर : ७१.८४
 • वडवणी : ८०.४९

एकूण : ८१.२३
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News