प्रियांकासारखा ड्रेस घातल्यानंतर भुमीला चाहतेच म्हणाले; भाभीजी...

यिनबझ टीम
Wednesday, 26 February 2020

काही दिवसांपूर्वी ग्रॅमी पुरस्काराच्या वेळी प्रियांका चोप्राने एक आउटफिट डीप नेक ड्रेस परिधान केला होता, ज्यामुळे मोठ्याप्रमाणात तिला ट्रोल करण्यात आलं होतं. आता भुमी पेडणेकरलाही त्याच ट्रोलिंगमधून जावं लागत आहे.

काही दिवसांपूर्वी ग्रॅमी पुरस्काराच्या वेळी प्रियांका चोप्राने एक आउटफिट डीप नेक ड्रेस परिधान केला होता, ज्यामुळे मोठ्याप्रमाणात तिला ट्रोल करण्यात आलं होतं. आता भुमी पेडणेकरलाही त्याच ट्रोलिंगमधून जावं लागत आहे. सोमवारी झालेल्या तिच्या फोटोशुटमध्ये तिने प्रियंकासारखाच डीप नेक ड्रेस परिधान केला होता. ज्यामुळे तिला तिचेच चाहते ट्रोल करत आहेत.

भुमीने आपले फोटो तिच्या इन्स्टा अकांऊटवर शेअर करताच, कमेंटचा ढिग जमा होण्यास सुरू झाला. काहींनी तर तिला भाभीजी बनवून टाकले आहे, तर काहींनी तुम्हाला या कपड्यांमध्ये अनकम्फर्टेबल वाटत आहे का? असा सवाल केला आहे.

तसं पाहिल्यास प्रियांकाने परिधान केलेल्या डीप नेक ड्रेसमुळे सोशल मिडीयावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या, एक म्हणजे तो ड्रेस ज्यांना आवडला नाही त्यांच्या आणि दुसरीकडे तिची आई मधु चोप्रा, मैत्रीण कटरिना कैफ यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी तिचं या ड्रेसमुळे कौतुकदेखील केलं होतं.

मला लाज वाटत आहे, अशा शब्दात स्वत: भुमीने या फोटोला कॅप्शन दिलं आहे, मात्र ताहिरा कश्यप या कॅप्शनला बस कर, खूप हॉट दिसतेस, अशी कमेंट केली आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Am blushing ☺️ . . . #hello #monday #love #blushpink

A post shared by Bhumi (@bhumipednekar) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News