'ही' भोजपुरी अभिनेत्री सुबोध भावेंसोबत करणार मराठी चित्रपटात पदार्पण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 February 2020
  • भोजपुरी अभिनेत्री मधू शर्मा ही सुबोध भावे याच्या आगामी चित्रपट 'भयभीत' च्या माध्यमातून मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. 

मराठीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत. आपल्या यशामुळे त्यांनी मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली. मात्र आता बाहेरील लोकांचा मराठी चित्रपटात वावर वाढताना दिसत आहे.

अन्य भाषेतील कलाकार मराठी भाषेत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता चक्क भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. भोजपुरी अभिनेत्री मधू शर्मा ही सुबोध भावे याच्या आगामी चित्रपट 'भयभीत' च्या माध्यमातून मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. 

'भयभीत' या चित्रपटात सुबोध भावेची मुख्य भूमिका असणार आहे. अभिनेत्री मधू शर्मा हीचा हा पहिला मराठी चित्रपट असून ती यामध्ये काव्या नावाच्या डॉक्टरची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी मधुने अनेक भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

 

दरम्यान याबाबत मधू शर्मा हिला विचारले असता, ती म्हणाली की, कोणत्याही कलाकारासाठी भाषा अनिवार्य नसते. भाषेपेक्षा अधिक अभिनेत्यांनी भूमिकेकडे पाहावे. अनेक दिवसांपासून मी वेगळ्या भूमिकेच्या शोधात होते.

ज्यावेळी चित्रपट दिग्दर्शक दीपक नायडू यांनी मला या चित्रपटाची कथा ऐकवली, त्यावेळी मला प्रचंड आवडली. अशा प्रकारच्या चित्रपटात काम करण्याची माझी सुरुवातीपासून इच्छा होती, या चित्रपटाच्या माध्यमातून ती पूर्ण झाली, असं देखील मधूने सांगितले.  

दरम्यान, भयभीत या मराठी चित्रपटातून भोजपुरी अभिनेत्री मधू शर्मा स्क्रीन शेअर करणार आहे. यापूर्वी मधुने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. यामध्ये 'खिलाडी', 'तिरंगा', 'योद्धा' हे चित्रपट हिट ठरले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News