भोजपुरीतील अभिनेत्री मधू शर्मा आता मराठीत पदार्पणासाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 February 2020

आता मधू मराठीमध्ये नवी इनिंग खेळण्यास सज्ज झाली आहे. ‘भयभीत’ या चित्रपटामधून ती मराठीमध्ये पदार्पण करत आहे. या भयपटात तिला सुबोध भावेबरोबर काम करण्याची संधी मिळत आहे. मधू म्हणते, ‘भाषा कोणतीही असो; काम करणे महत्त्वाचे. मला भयपट आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती.

हिंदीतील काही सुप्रसिद्ध चेहरे मराठीमध्ये काम करत असताना आता भोजपुरी अभिनेत्रीलाही मराठी चित्रपटांची भुरळ पडली आहे. भोजपुरीतील एक नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री मधू शर्मा.

आता मधू मराठीमध्ये नवी इनिंग खेळण्यास सज्ज झाली आहे. ‘भयभीत’ या चित्रपटामधून ती मराठीमध्ये पदार्पण करत आहे. या भयपटात तिला सुबोध भावेबरोबर काम करण्याची संधी मिळत आहे. मधू म्हणते, ‘भाषा कोणतीही असो; काम करणे महत्त्वाचे.

मला भयपट आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा होती. ती ‘भयभीत’ या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली. दीपक नायडू दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शंकर रोहरा आणि दीपक नारायणी यांनी केली आहे.

मधूच्या या नव्या प्रयत्नांना प्रेक्षक कितपत दाद देतात, हे पाहणंही रंजक ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News