भावसार ठरले यंदाच्या दामले क्रीडा पुरस्काराचे मानकरी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृती क्रीडा पुरस्कार मुंबईचे ज्येष्ठ कबड्डी मार्गदर्शक व अर्जुन पुरस्कारविजेते राजू भावसार यांना दिला जाणार आहे.

पुणे: महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृती क्रीडा पुरस्कार मुंबईचे ज्येष्ठ कबड्डी मार्गदर्शक व अर्जुन पुरस्कारविजेते राजू भावसार यांना दिला जाणार आहे. महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक कै. कॅप्टन शिवरामपंत दामले यांच्या स्मरणार्थ व्यायाम, क्रीडा, सैनिकी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना 1998 पासून हा पुरस्कार दिला जात आहे. या पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मिृतचिन्ह असे आहे. यंदाच्या या क्रीडा पुरस्काराचे वितरण टिळक रोड येथील महाराष्ट्रीय मंडळात एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते होणार असून पुरस्काराची तारीख व वेळ नंतर कळवण्यात येईल.

पुरस्कारविजेते राजू भावसार हे छत्रपती पुरस्काराचेदेखील मानकरी आहेत. याआधी हे पुरस्कार हिंद केसरी, अर्जुन पुरस्कारविजेते कोल्हापूरचे कै. गणपतराव आंदळकर, सांगलीचे कै. राजा स्वामी, अमरावतीचे प्रभाकरपंत वैद्य, लोणावळ्याचे कै. डॉ. घरोटे, पुण्याचे बी. पी. झंवर, मनोज देवळेकर, कै. बी. के. एस. अय्यंगार, सांगलीचे राम नलावडे, उस्मानाबादचे शिवाजीराव नलावडे, मुंबईचे मधुकर तळवलकर, नाशिकचे भिष्मराज बाम, पुण्याचे फिदा कुरेशी, डॉ. विश्‍वनाथ कराड, अजय शिर्के, अनंतराव थोपटे, अण्णा ऊर्फ एस. व्ही. नातू, नंदन बाळ, अभिजित कुंटे, मुंबईचे विकास वालावलकर, उदय पवार, कमलेश मेहता, आणि पुण्याचे राम भागवत यांना प्रदान करण्यात आले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News