‘सकाळ’च्या वर्धापनदिनी स्वरूप भालवणकरचा रॉकिंग परफाॅर्मन्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

चोखंदळ वाचकांची पहिली पसंत असलेल्या ‘सकाळ’च्या वऱ्हाड आवृत्तीला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.

अकोला - चोखंदळ वाचकांची पहिली पसंत असलेल्या ‘सकाळ’च्या वऱ्हाड आवृत्तीला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने येत्या शनिवारी, ता. ८ जून रोजी वऱ्हाड आवृत्तीचा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा होत आहे. नेहमीच वाचकांशी ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याचा ‘सकाळ’चा प्रयत्न असतो. तिसऱ्या वर्धापनदिनी अकोल्यात वाचकांसाठी ‘तुला लागली कुणाची हिचकी’, ‘मला लगीन करायचं’, ‘गुलाबी रिझिम’ यासारख्या रोमेंटिक व्हिडिओ अल्बममधून रसिकांच्या मनावर राज्य करणारा गायक, संगीतकार स्वरूप भालवणकर यांच्या नव्या, जुन्‍या गाण्यांच्या रॉकिंग परफॉर्मन्सचे आयोजन  करण्यात आले आहे.

सोबतच नवरंग कथ्थक केंद्र व बँड अद्वेतचा सहभाग या स्वरझंकारमध्ये राहणार आहे.  अकोल्यातील गांधी रोडवर प्रमिलाताई ओक सभागृहात ८ जून रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता ‘सकाळ’ वर्धापनदिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीत रसिकांच्या व युवा मनांचा ठाव घेत सुरांचा जल्लोष रसिकांना वेगळी अनुभूती देवून जाईल, यात शंका नाही. आपल्या कर्तृत्वाने यशोशिखर गाठणाऱ्या विविध श्रेत्रातील नामवंतांच्या हृद्य सत्काराचे आयोजनही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले आहे. 

सकाळ माध्यम समूहाचे प्रत्येक पाऊल हे समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठीच राहिले आहे. सकारात्मक, विकासात्मक आणि प्रभावी वार्तांकनाला ‘सकाळ’ने नेहमीच पसंती दिली आहे. विविध सामाजिक उपक्रमांसह अकोल्याला वैभवशाली शहर घडविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला सुजान वाचकांनी चांगलीच पसंती मिळते आहे. शिवाय वऱ्हाडातील अनेक शहरे व गावांच्या विकासावरही आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. त्याला वाचकांचे पाठबळही लाभते आहे. 

‘स्वरझंकार’मध्ये यांचाही सहभाग

अद्वैत बँडचे कलाकार शशांक शितोळे, अभिजित भावे, अनुप दुतोंडे, शिवम भाैरदकर, मंगेश राऊत, मनोज राऊत, नंदकिशोर मानकर, अक्षय बुराने, पल्लवी राऊत, प्रज्योत देशमुख, डॉ. प्रवीण देशमुख, रोशन वारके यांचे सकाळ वर्धापनदिनी आयोजित ‘स्वरझंकार’ या संगीत कार्यक्रमाला सहकार्य लाभणार आहे. याशिवाय नवरंग कथ्थक केंद्राच्या विद्यार्थिनी, नयना जाधव, कांचन हिवाळे, दिशा शिरसाट, स्वप्नाली बंड यांचाही या कार्यक्रमात सहभाग असेल. लावणी क्विन पूनम केकजा ही अदाकारीही बघण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News