जगात असे काही देश आहेत जिथे तरुणांनी नक्कीच गेलं पाहिजे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 14 September 2019

तुमचं वय जर 25 ते 35 मध्ये असेल तर नोकरीसोबत या गोष्टीही करा कारण...फक्त ऑफिस आणि घर या पलिकडेही जग आहे. तुम्हाला आपला देश सोडून इतर देशात फिरायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही पर्याय घेऊन आलो आहोत. असे काही देश जिथे तरुणांनी नक्कीच गेलं पाहिजे.

तुमचं वय जर 25 ते 35 मध्ये असेल तर नोकरीसोबत या गोष्टीही करा कारण...फक्त ऑफिस आणि घर या पलिकडेही जग आहे. तुम्हाला आपला देश सोडून इतर देशात फिरायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही पर्याय घेऊन आलो आहोत. असे काही देश जिथे तरुणांनी नक्कीच गेलं पाहिजे.

दक्षिण आफ्रिका- एकदा तरी या देशाला भेट दिलीच पाहिजे. इथे खऱ्या जगाची ओळख होईल. गेली अनेक वर्ष हा देश वंशभेदाशी लढत आहे. महात्मा गांधींनी त्यांच्या सुरुवातीचा काही काळ या देशात घालवला होता.

न्यूझीलंड- हा देश पाहण्यासाठी कुठल्याही एका कारणाची गरज नाही. निसर्गाचा वरदहस्त असलेल्या या देशात तुम्हाला सुंदर स्थळांपासून ते अॅडव्हेंचर खेळांपर्यंत सर्व गोष्टी मिळतील. फिरण्यासाठी हा देश पूर्णपणे सुरक्षित आहे.

इटली- इथे तुम्ही वर्तमान आणि भूतकाळचं सुरेख मिश्रण पाहू शकता. चविष्ट जेवण, उत्तम सामाजिक जीवन हे इथलं मुख्य आकर्षण आहे. इथे एकदा आलेला व्यक्ती आयुष्यात दुसऱ्यांदाही जातोच अशी या देशाची खासियत आहे.

मालदीव- समुद्राचा स्वर्ग म्हणून मालदीवकडे पाहिलं जातं. इथे तुम्ही शांततेसोबतच समुद्राचा मनमुराद आनंद लुटू शकता. भारत ते मालदीव विमान प्रवासही स्वस्त आहे. विशेष म्हणजे इथले 100 खासगी बेट रिसॉर्ट तर जगभरात प्रसिद्ध आहेत.

ऑस्ट्रेलिया- इथे फिरण्याचा अर्थ संपूर्ण जग फिरण्यासारखं आहे. इथे प्रत्येक प्रकारचं सामाजिक जीवन पाहायला मिळतं. जगभरातील अनेक लोक या देशात राहत असल्यामुळे वेगवेगळी संस्कृती तुम्हाला इथे पाहायला मिळते. याशिवाय जगभरातील अनेक विद्यार्थी या देशात शिकायला येतात. भारतीयांचीही संख्या इथे मोठी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News