12 वी नंतर बायोटेक्नोलॉजी करियरचा उत्तम पर्याय; जाणून घ्या! भविष्यातील स्कोप आणि संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 18 September 2020

असे काही करिअरचे पर्याय आहेत भविष्यात मोठी संधी आणि नोकरी उपलब्ध करून देणार आहेत

मुंबई : बारावीनंतर करिअरचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांपुढे उपलब्ध आहेत मात्र, भविष्यात स्कोप असणारा पर्याय तरुणाई निवडताना दिसते. बहुतांशी विद्यार्थ्यांचा कल बारावीनंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाकडे असतो. मात्र असे काही करिअरचे पर्याय आहेत भविष्यात मोठी संधी आणि नोकरी उपलब्ध करून देणार आहेत. त्यात बायोटेक्नॉलॉजी हा करिअरचा उत्तम पर्याय असू शकतो. 

काय आहे बायोटेक्नोलॉजी?

बायो आणि टेक्नॉलॉजी दोघांच्या एकत्रीकरणातून बायोटेक्नोलॉजी नवीन शाखा निर्माण झाली. मानवी जीनव सुसहाय्य करण्यासाठी बायोटेक्नोलॉजीचा वापर केला जातो. सजीवांच्या डीएनएवर आधारित बायोटेक्नोलॉजी आधारित आहे. सजीव सृष्टीची रचना, त्यांचा उपयोग वैद्यकीय, कृषी आणि अन्न व नागरी क्षेत्रामध्ये कसा केला जाऊ शकतो याचा शोध घेतला जातो. बहुतांशी संशोधन हे लॉबमध्ये केले जाते. बारावीनंतर बायोटेक्नोलॉजीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी तीन वर्षाची आहे. त्यात मानवी जीवांचा अभ्यास केला जातो. तसेच बायोटेक हा अभ्यासक्रम चार वर्ष कालावधीचा आहे. संशोधनावर अधिक भर दिला जातो. त्यानंतर पदव्युत्तर पदवीसाठी बायोटेक्नॉलॉजी मध्ये एम, एस्ससी आणि एम. टेक करता येते. पुढे जाऊन संशोधक म्हणून पीएचडी मिळविता येते.

भविष्यातील संधी

दिवसेंदिवस बायोटेक्नोलॉजीचे क्षेत्र वाढत आहे, बायोटेक्नोलॉजीमध्ये करिअर केल्यानंतर विद्यार्थ्यांना खासजी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रात नोकरीची संधी आहे. कृषी, वैद्यकीय, हेल्थ, कापड, केमीकल, खाद्य आणि औषध क्षेत्रात नोकरी मिळू शकते. संशोधन म्हणून काम करु शकता. 

देशातील नामवंत शिक्षण संस्था 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली, रुडकी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, अलगप्पा कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, नेताजी सुभाष चंद्र बोस औद्योगिक विद्यापीठ, थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, दिल्ली विद्यापीठ बायोटेक्नोलॉजी अभ्यासक्रम शिकणाऱ्या देशातील काही नामवंत संस्था आहेत. या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी पुर्व परीक्षा द्यावी लागते. पुर्व परीक्षेच्या मार्कांवर विद्यार्थ्यांना प्रेवश दिला जातो.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News