करियरचा उत्तम पर्याय पब्लिक रिलेशन; जाणून घ्या संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020

नोकरीची आणि व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध असल्यामुळे पीआरचे महत्व वाढले आहे. भविष्यात ही संधी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सध्या तरुणांपुढे करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र ज्या क्षेत्रामध्ये तरुणाईला आवड आहे, असे पर्याय निवडल्यास करिअरमध्ये आनंद मिळतो. सध्या  तरुणाईचा कल पब्लिक रिलेशन (PR) क्षेत्राकडे वाढत आहे. नोकरीची आणि व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध असल्यामुळे पीआरचे महत्व वाढले आहे. भविष्यात ही संधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पीआर क्षेत्रात असणाऱ्या विविध नोकरीच्या, व्यवसाय यांची माहिती आम्ही देत आहोत.

रोजगाराची संधी

पब्लिक रिलेशन हे क्षेत्र खूप व्यापक क्षेत्र आहे. अनेक क्षेत्रांमध्ये पब्लिक रिलेशन उमेदवारांची गरज असते. केंद्र आणि राज्या सरकारचे विविध खाते, औद्योगिक कारखाने, खाद्य कंपन्या, प्रसारमाध्यम अशा विविध क्षेत्रात काम करण्याची संधी तरुणाईला मिळते. त्याचबरोबर ज्या तरुणांना कायदाची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांना लॉ फॉर्ममध्ये नोकरीची संधी मिळते. छोट्या उद्योग समूहाला पीआर जनसंपर्क अधिकारी म्हणून व्यक्तींची गरज असते, असे उद्योद उमेदवारांच्या शोधात असतात. पीआरमध्ये पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना विना अनुभव नोकरी प्राप्त होते.  

पीआरसाठी कोणते कौशल्य आवश्यक?

पब्लिक रिलेशन करताना विद्यार्थ्यांना विविध कौशल्याची आवश्यकता असते. रिलेशन, कम्युनिकेशन, रायटिंग स्किल,  क्रिएटिव्ह थिंकिंग अशा कौशल्यांची गरज भासते. पीआरना अनेकांशी संपर्क ठेवावा लागतो, व्यक्ती किंवा कंपनीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी लागते, त्यासाठी क्रिएटिव्ह थिंकिंग असणे आवश्यक आहे. कमी शब्दात अधिक माहिती पोहोचवण्यासाठी हे कौशल्य अतिशय महत्त्वाचे आहे.

व्यवसायाची संधी

ज्या विद्यार्थ्यांना नोकरीचा मार्ग स्वीकारायचा नाही, व्यवसाय करायचा आहे अशा उमेदवारांसाठी पीआर एजन्सी पर्याय उपलब्ध आहे. देशातील नामवंत व्यक्तींना जनसंपर्क अधिकारी म्हणून उमेदवारांची गरज असते. तर कंपन्यांना पीआ एजन्सीची आवश्यकता भासते. कंपन्या आणि नामवंत व्यक्ती आपली कामे पीआर एजन्सीकडून करुन घेतात. त्यामुळे सध्या पीआरला सुगीचे दिवस आले आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News