फक्त पाच मिनिटं योग केल्याने हे फायदे होतील 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 September 2019

योग आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे अनेकजणांना माहीत असूनही याकडे कानाडोळा करतात. पण फक्त पाच मिनिटं योग केल्यानेही तुम्हाला लक्षणीय लाभ मिळू शकतो.

योग आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे अनेकजणांना माहीत असूनही याकडे कानाडोळा करतात. पण फक्त पाच मिनिटं योग केल्यानेही तुम्हाला लक्षणीय लाभ मिळू शकतो.

मनः शांती मिळते-  जेव्हाही तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतील तेव्हा योगअभ्यास सुरू करा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुम्हाला रिलॅक्स वाटेल. याशिवाय योग नेहमीच तुम्हाला सकारात्मकतेकडे जायला मदत करेल.

आनंदी ठेवतं- दररोज पाच मिनिटं योगाभ्यास केल्यास तुम्हाला लक्ष केंद्रीत करायला मदत मिळते आणि तुमच्या मनातील चुकीच्या विचारांना दूर सारून मन आनंदी राहण्यास फार उपयोग होतो.

ऊर्जा- दररोज पाच मिनिटं योग केल्याने तुम्ही तुमचं काम लक्षपूर्वक करू शकाल. याशिवाय सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्यात होतो. आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने तुम्ही पाहू लागता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News